बहिणीकडे केलेली भाऊबीज अखेरची ठरली; भावाच्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2022 10:47 IST2022-10-29T10:47:19+5:302022-10-29T10:47:38+5:30
वालझिरीची घटना : पाचोरा येथील राहुलच्या मृत्यूनंतर आक्रोश

बहिणीकडे केलेली भाऊबीज अखेरची ठरली; भावाच्या मृत्यूनं कुटुंबावर शोककळा पसरली
जळगाव - भाऊबिजेला बहिणीकडे आलेल्या भावाचा नदीत बुडून मृत्यू झाला. ही घटना वालझिरी, ता. चाळीसगाव येथे गुरुवारी घडली. राहुल सुरेश चौधरी (१७, रा. श्रीरामनगर, सिंधी कॉलनी, जामनेररोड, पाचोरा) असे या दुर्दैवी भावाचे नाव आहे. भाऊबीजेसाठी तो चाळीसगाव तालुक्यातील वालझिरी येथील बहिणीकडे गेला होता.
भाऊबीजेचा आटोपल्यानंतर दि. २७ रोजी दुपारी राहुल हा वालझिरी (चाळीसगाव) येथे कार्यक्रम आयोजित नवसाच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. राहुल याचा पाय घसरून तो थेट खोल पाण्यात पडला. हा प्रकार त्याच्यासोबत असलेल्या मुलांनी परिवारातील सदस्यांना सांगितला. उपस्थितांच्या मदतीने राहुल यास पाण्यातून बाहेर काढण्यात आले. त्याला लागलीच चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात आणले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत दरम्यान, नदीपात्राजवळ हात पाय घोषित केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह धुण्यासाठी गेला असता अचानक नातलगांच्या स्वाधीन करण्यात आला.
राहुल याच्या पश्चात वृद्ध आई, बहीण, मेहुणे असा परिवार आहे. राहुल याची घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्यामुळे मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. या घटनेनंतर राहुलच्या बहिणीच्या गावी तसेच त्याच्या पाचोरा येथील घर परिसरात शोककळा पसरली. राहुलच्या कुटुंबियांनी प्रचंड आक्रोश केला.