अंडरवर्ल्ड डॉन 'डॅडी'ची पॅरोलवर नागपूर कारागृहातून सुटका

By Admin | Updated: October 21, 2016 13:46 IST2016-10-21T13:42:20+5:302016-10-21T13:46:01+5:30

गवळीच्या आजारी पत्नीवर २५ ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी त्याला रजा देण्यात आली आहे.

Underworld Don 'Daddy' parole to be released from jail in Nagpur | अंडरवर्ल्ड डॉन 'डॅडी'ची पॅरोलवर नागपूर कारागृहातून सुटका

अंडरवर्ल्ड डॉन 'डॅडी'ची पॅरोलवर नागपूर कारागृहातून सुटका

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २१ - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी अखेर पॅरोलवर तुरुंगाबाहेर आला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कुख्यात डॉन अरुण गवळी उर्फ डॅडीला २१ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबरपर्यंत अभिवचन रजा (पॅरोल) मंजूर केली आहे. गवळीच्या आजारी पत्नीवर २५ ऑक्टोबर रोजी शस्त्रक्रिया होणार आहे. त्यासाठी त्याला रजा देण्यात आली आहे.
 
विभागीय आयुक्तांनी रजेचा अर्ज नाकारल्यामुळे गवळीने उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. ही याचिका अंशत: मंजूर करण्यात आली आहे. गवळीच्या पत्नीच्या गर्भाशयात गाठ आहे.
 
त्यांना शनिवारी रुग्णालयात भरती करण्यात येणार आहे. गवळीला शिवसेनेचे नगरसेवक कमलाकर जामसांडेकर यांच्या हत्याप्रकरणात जन्मठेपेची शिक्षा झाली आहे. यापूर्वी मागच्यावर्षी मुलाच्या लग्नासाठी गवळी पॅरोलवर बाहेर आला होता. 
 
 
 

Web Title: Underworld Don 'Daddy' parole to be released from jail in Nagpur