समजून घ्या ‘कोरोना’, शिंकावे कसे ? नवी शिंकसंहिता

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 06:14 AM2020-06-11T06:14:35+5:302020-06-11T06:14:48+5:30

कोरोनाची साथ देशात सुरूहोऊन ४ महिने होत आहेत; पण तरीही हा आजार पसरण्याचा मुख्य स्रोत शिंक असताना योग्य प्रकारे शिंकावे कसे, हे अजूनही अनेकांना माहीत नसल्याचे दिसून येते.

Understand ‘Corona’, how to sneeze? New sink code | समजून घ्या ‘कोरोना’, शिंकावे कसे ? नवी शिंकसंहिता

समजून घ्या ‘कोरोना’, शिंकावे कसे ? नवी शिंकसंहिता

Next

कोरोनाची साथ देशात सुरूहोऊन ४ महिने होत आहेत; पण तरीही हा आजार पसरण्याचा मुख्य स्रोत शिंक असताना योग्य प्रकारे शिंकावे कसे, हे अजूनही अनेकांना माहीत नसल्याचे दिसून येते. शिंकण्यामुळे नाकातील जंतू १०० मैल प्रतितास या वेगाने पुढे जातात. आपल्याला शिंकताना नाकासमोर हात धरा किंवा एका बाजूला होऊन हाताच्या वरच्या भागावर म्हणजे बाहू वर शिंका, असे सांगण्यात येते. कुठल्या प्रकारे शिंकल्यास त्यातून किती दूरवर जंतू जाऊ शकतात हे पाहूया..

१. कुठल्याही अडथळ्याशिवाय शिंकल्यास शिंकेतील जंतू ११ फुटांपर्यंत जातात.
२. समोर हात पकडला, तर शिंकेतील जंतू ३.५ फुटांपर्यंत जातात. पण यात हातावर शिंक येते आणि ते हात इतरत्र लागल्यास संसर्गाचा एक मार्ग खुला होतो.
३. सध्या सांगितल्याप्रमाणे बाहूवर शिंकले, तरी ही शिंक एका बाजूला ८.५ फुटांपर्यंत जाते म्हणून यासाठी भोवतीच्या लोकांना संसर्ग होणार नाही, यासाठी पुढील गोष्टी केल्या जाऊ शकतात.
च्शिंकताना पूर्ण चेहरा मोठा टिश्यू पूर्ण चेहरा झाकेल असा नाकाच्या भोवतीचा भाग झाकेल, असा
नाकासमोर पकडावा.
च्शिंकताना शक्य असल्यास खाली बसावे व बसने शक्य नसल्यास खाली जमिनीकडे बघावे.
च्टिश्यू नाकासमोर पकडताना नाक दाबू नये, टिश्यू हा मास्क ज्या जागेवर घट्ट बसतो त्या भागात दाबून पकडावा. टिश्यू पर्याय असू शकतो चेहरा मावेल असा स्टेपलरच्या मदतीने बनवलेला कागदाचा छोटा त्रिकोण बनवून वरच्या खिशात ठेवता येईल. यासाठी छोट्या कागदी बॅग्सचाही वापर करता येईल. आॅफिसमध्ये प्रत्येकाच्या टेबलवर असे त्रिकोण / कागदी बॅग्स बनवता येतील. थोडे इनोव्हेशन करून खास शिकण्यासाठी स्निझिंग बॅग्स बनवता येतील.
च्शिंकताना आधी ३० सेकंद शिंक येणार आहे ही जाणीव होते, अशा वेळी खिडकीजवळ जावे.
च् तसेच सर्वांनी अशी भावना जाणवली की हात वर करावा. ही शिंक आल्याची एक जागतिक सांकेतिक भाषा बनावी. हात वर केला की आॅफिसमध्ये सोबत बसलेले, सार्वजनिक ठिकाणी लोक शिंकणाऱ्यापासून तोंड दुसºया बाजूला करतील.
च्एसी खोली असेल तर खिडकीचा एक कोपरा उघडता येईल असा ठेवावा व त्यानंतर ५ मिनिटे खिडकी उघडी ठेवून एसी बंद ठेवावा.
च्गाडीत शिंक आल्यास चालक सोडून इतरांनी फक्त आपली खिडकी उघडून नाकासमोर टिश्यू ठेवून खिडकीकडे तोंड करून शिंकावे, त्या वेळी इतरांनी खिडकी उघडू नये. शिंकून झाले की मात्र सर्वांनी
५ मिनिटे खिडकी उघडी ठेवावी.
च् चालकाला शिंक आल्यास त्याला हाताला लागेल असे डाव्या बाजूला हँडब्रेक असतो, तिथे टिश्यू ठेवावे व त्याने टिश्यूचा वापर करावा. शिंकून झाल्यावर कधीही हात धुवावे, हात धुणे शक्य नसल्यास हातावर सॅनिटायजर घ्यावा.
- अमोल अन्नदाते,
(लेखक बालरोगतज्ज्ञ असून, वैद्यकीय साक्षरतेसाठी कार्यरत आहेत.)
 

Web Title: Understand ‘Corona’, how to sneeze? New sink code

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.