नागरिकांची बेपर्वाई की प्रशासनाची बेफिकिरी?
By Admin | Updated: July 13, 2016 17:05 IST2016-07-13T16:14:55+5:302016-07-13T17:05:27+5:30
मंगळवारी दुपारी पालखेड धरणातून अचानक सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे दिंडोरी व निफाड तालुक्यात १२ जण अडकल्याची घटना घडली होती.

नागरिकांची बेपर्वाई की प्रशासनाची बेफिकिरी?
ऑनलाइन लोकमत/भगवान गायकवाड
दिंडोरी (नाशिक), दि. 13 - मंगळवारी दुपारी पालखेड धरणातून अचानक सोडलेल्या पाण्याच्या विसर्गामुळे दिंडोरी व निफाड तालुक्यात १२ जण अडकल्याची घटना घडली होती. प्रशासनाने त्यांना वेळीच उपाययोजना करत वाचिवले असले तरी अशी घटनाच का घडावी असा प्रश्न पडत असून यात नागरिकांची बेपर्वाही कि प्रशासनाची बेफिकिरी असा सवाल उपस्थित होत आहे
पालखेड धरण हे धरण नसून तो एकप्रकारे स्टोअर टँक आहे. पालखेड धरणाचे वरचे बाजूला वाघाड करंजवन ओझरखेड पुणेगाव हि धरणे असून सदर धरणे ओवरफ्लो झाले कि ते पाणी पालखेड मध्ये येते. त्यामुळे पाटबंधारे विभागाला पश्चिम भागात किती पाऊस होतो यांचे नियोजन करत पालखेड मधून कादवा नदीत पाणी सोडावे लागते मात्र पाटबंधारे विभागाचे नियोजनाचा अभाव पावसाच्या पिहल्या दिवसापासून दिसून आला दोन तारखेपासून या भागात पाऊस सुरु असतानाही प्रशासनाने शुक्र वार पासून येवल्याला आवर्तन देण्यासाठी पालखेड करंजवन मधून पाणी पालखेड मध्ये पाणी सोडले होते तर शनिवारी रात्रीपासून पावसाचा जोर वाढत सर्व नद्यांना पूर आले तरी मागणी करूनही धरणातील विसर्ग बंद केला गेला नाही कि कालव्याला पाणी सोडले नाही. अखेर रात्री सर्व नद्यांच्या महापुराचे पाणी धरणात येत अवघ्या तीन चार तासात धरण सत्तर टक्के भरले तेव्हा कुठे पाटबंधारे विभाग खडबडून जागा होत रात्री नऊ वाजता नदी व कालव्याला पाणी सोडले. सुदैवाने रात्रीच्या वेळेला पाणी सोडल्याने काही अनुचित घटना घडली नाही. पण अवघ्या एकच दिवसाच्या अंतरात मंगळवारी पश्चिम भागात पुन्हा जोरदार पाऊस होत नद्यांना मोठे पूर आले, मात्र याचाही पुरेसा अंदाज न आल्याने एकाच वेळी २५ हजार क्युसेस पाणी सोडले अन गाफील असलेले धरणाजवळून हाकेच्या अंतरावर मासे पकडत असलेले सहा आदिवासी अडकले व पुढे ३०-३५ किमीवरूल कुंदेवाडी येथेही सहा जण या पुरात अडकले. त्यांनाही सुखरूप बोहर काढण्यात आले. बर्याच वेळा पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असताना पूर्व भागात तो नसतो त्यामुळे नागरिकांना पूर येईल असे वाटत नाही. मात्र वास्तविक पाहता भोंगे वाजवत नागरिकांना सावध करणे गरजेचे असताना येथील सदर यंत्रणाच बंद असल्याचे उघड होत प्रशासनाची बेफिकिरी समोर आली आहे. तसेच विविध गावातही पाणी सोडण्याची कल्पना देत भोंगे वाजवणे गरजेचे असताना तसेहि कुठे अलर्ट केले गेले नाही. तसेच दिंडोरीचा हा प्रसंग उद्भवला असता केवळ वेळेत महसूल प्रशासन अग्निशमन दल आपत्ती सावरण्यासाठी वेळेत आले तर पोलीस प्रशासन उशिरा का होईना आले, पण आरोग्य यंत्रणा कुठे दिसली नाही कि घटनास्थळी जाणे व इतर मदतीला पाटबंधारे विभाग कि बांधकाम विभाग कुठे दिसला नाही. मुळात अशी घटना घडू नये यासाठी जनतेने सावधानता बाळगणे गरजेचे असले तरी प्रशासकीय यंत्रानेनेही अलर्ट राहत अलर्ट देण्याची आवश्यकता आहे.