शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

गरिबांना प्रवेश नाकारणाऱ्या शाळांची मान्यता रद्द

By admin | Updated: July 16, 2015 04:11 IST

मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यांतर्गत (आरटीई) प्राथमिक शिक्षण प्रवेशात २५ % जागा आर्थिक दुर्बल घटकातून न भरणाऱ्या शाळांची मान्यताच रद्द केली जाईल

मुंबई : मोफत व सक्तीचे शिक्षण कायद्यांतर्गत (आरटीई) प्राथमिक शिक्षण प्रवेशात २५ % जागा आर्थिक दुर्बल घटकातून न भरणाऱ्या शाळांची मान्यताच रद्द केली जाईल, असे राज्य शासनाने हायकोर्टात स्पष्ट केले.केंद्राने कायदा लागू केल्यानंतर राज्य शासनाने याचे नियम जारी केले. त्याअंतर्गत प्राथमिक प्रवेशात आर्थिक दुर्बल घटकांसाठी २५% जागा राखीव ठेवणे सर्व शाळांना बंधनकारक आहे. मात्र काही शाळांत पूर्व प्राथमिक वर्गापासून शिक्षण दिले जाते, पण आर्थिक दुर्बल घटकांसाठी २५% जागा या शाळा राखीव ठेवत नव्हत्या. त्यामुळे राज्य शासनाने एप्रिल २०१५ मध्ये परिपत्रक जारी करून पूर्व प्राथमिक शाळांना या आरक्षणानुसार जागा भरण्याचे आदेश दिले. या विरोधात डझनभर शाळांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. न्या. अनुप मेहता व न्या. ए. एल. अचलिया यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी झाली. त्यात न्यायालयाने आरक्षणानुसार प्रवेश न देणाऱ्या शाळांवर काय कारवाई करणार, असा सवाल खंडपीठाने केला. त्यावर आरक्षणानुसार प्रवेश न देणाऱ्या शाळांची मान्यताच रद्द केली जाईल, असे अतिरिक्त सरकारी वकील नितीन देशपांडे यांनी सांगितले. न्यायालयाच्या आदेशानुसार आरटीई कायद्यांतर्गत प्रवेश नाकारणाऱ्या शाळांविरोधात पालकांना तक्रार करता यावी, यासाठी तालुका व महापालिका स्तरावर समिती स्थापन केल्याचे प्रतिज्ञापत्रही अ‍ॅड. देशपांडे यांनी न्यायालयात सादर केले. त्याची नोंद करून घेत न्यायालयाने ही सुनावणी एका आठवड्यासाठी तहकूब केली.