उल्हासनगर पालिका उपायुक्तांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

By Admin | Updated: February 20, 2016 21:56 IST2016-02-20T18:24:49+5:302016-02-20T21:56:17+5:30

उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त आणि जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना पालिकेच्या आवारातच जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे

Ulhasnagar Municipality tried to burn the Deputy People alive | उल्हासनगर पालिका उपायुक्तांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

उल्हासनगर पालिका उपायुक्तांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न

ऑनलाइन लोकमत - 
उल्हासनगर, दि. 20 - उल्हासनगर महापालिकेचे उपायुक्त आणि जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांना पालिकेच्या आवारातच जिवंत जाळण्याचा प्रयत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवराज भदाणे लगेच कारमधून बाहेर पडल्याने त्यांना काही इजा झालेली नाही.
  दुपारी 1 वाजताच्या सुमारास भदाणे हे कारमध्ये बसले असताना दोन अज्ञात व्यक्ती मोटारसायकलनं कार पार्किंगच्या आवारात आले आणि पेट्रोलनं भरलेली बाटली कारवर टाकून आग लावली. भदाणे यांनी तात्काळ कारमधून पळ काढल्यानं त्यांचा जीव वाचला.
 भदाणे यांची गाडी पुर्णपणे जळून खाक झाली आहे. महापालिकेच्या आवारातच अशी घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान, पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. अज्ञात व्यक्ती हेल्मेट घालून आल्यानं त्यांना शोधण्याचं मोठं आवाहन पोलिसांसमोर आहे.
 

 

Web Title: Ulhasnagar Municipality tried to burn the Deputy People alive