उल्हासनगर: खड्ड्यात दुचाकी अडकून तरूणीचा मृत्यू
By Admin | Updated: October 14, 2016 09:26 IST2016-10-14T09:23:16+5:302016-10-14T09:26:07+5:30
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले असतानाच खड्ड्यांमुळे एका तरूणीला जीव गमवावा लागल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली

उल्हासनगर: खड्ड्यात दुचाकी अडकून तरूणीचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत
उल्हानगर, दि. १४ - रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे सर्वसामान्य नागरिक हैराण झालेले असतानाच खड्ड्यांमुळे एका तरूणीला जीव गमवावा लागल्याची घटना उल्हासनगरमध्ये घडली. नेहा मिरचंदानी असे त्या दुर्दैवीत तरूणीचे नाव आहे. काल सकाळी नेहा तिच्या वडिलांसोबत अॅक्टिव्हा गाडीवरून जात असताना खैरानी रोड येथे त्यांच्या गाडीला एका रिक्षाने धडक दिली व त्यांची दुचाकी खड्ड्यात अडकली. त्यामुळे नेहा गाडीवरून खाली पडली व मागून येणा-या ट्रकच्या चाकाखाली चिरडून तिचा मृत्यू झाला. या संपूर्ण घटनेमुळे शहरात संतापाचे वातावरम असून खड्ड्यांमुळेच आपल्या मुलीचा जीव गेल्याचा दावा मिरचंदानी कुटुंबियांनी केला असून दोषींवर ताबडतोब कारवाई करा, अशी मागणीही केली आहे.