शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

उजनी धरण परिसराला राष्ट्रीय अभयारण्य घोषित करावे : मिलिंद गुणाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 12:45 PM

मिलिंद गुणाजींच्या कॅमेºयात उजनी परिसरातील पक्षी कैद

ठळक मुद्देवन्यजीव छायाचित्रकार व अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी उजनी पाणलोट क्षेत्रात पक्षी निरीक्षण केलेसूर्योदयापूर्वी पळसदेव परिसरात सुरु झालेली त्यांची ही मोहीम डिकसळ व कोंढारचिंचोलीजवळ जुन्या रेल्वे पुलाजवळील परिसरात भटकंती करून संपली.

सोलापूर : उजनी धरण परिसराची प्राकृतिक व भौगोलिक परिस्थिती अतिशय अनुकूल असल्यामुळे या ठिकाणी पक्षीवैविध्याची परंपरा लाभली आहे. केंद्र व राज्य सरकारने या परिसराला राष्ट्रीय पक्षी अभयारण्य म्हणून घोषित करून या परिसराच्या संरक्षणाचे काम हाती घ्यायला हवे, असे मत मिलिंद गुणाजी यांनी ‘लोकमत’ शी बोलताना व्यक्त केले.

वन्यजीव छायाचित्रकार व अभिनेते मिलिंद गुणाजी यांनी उजनी पाणलोट क्षेत्रात पक्षी निरीक्षण केले. गुणाजी यांनी स्थानिक पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार यांच्या मदतीने पक्षी निरीक्षण करून या परिसरातील अनेक पक्ष्यांना आपल्या कॅमेºयात कैद केले. सूर्योदयापूर्वी पळसदेव परिसरात सुरु झालेली त्यांची ही मोहीम डिकसळ व कोंढारचिंचोलीजवळ जुन्या रेल्वे पुलाजवळील परिसरात भटकंती करून संपली.

गुणाजी हे एका खासगी कामानिमित्त सोलापुरात आले होते. त्यांनी मुंबईच्या परतीच्या प्रवासात भिगवणजवळच्या उजनी पाणलोट क्षेत्रातील पक्ष्यांचे छायाचित्रीकरण करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानुसार ही मोहीम राबविण्यात आल्याचे डॉ़ अरविंद कुंभार यांनी सांगितले. या मोहिमेत शेकडो रोहित पक्षी व हजारोंच्या संख्येने मुग्धबलाक व चितबलाक हे करकोचे आढळले. निरीक्षणाच्या वेळी स्थलांतरित बदके परत गेल्याने त्यांच्या चित्रीकरणाची संधी हुकली. 

यावेळी राखी बगळे, पाणकावळे, शेकाट्या, पाणभिंगरी, तुतुवार नदीसुरय, पाणभिंगरी, कुदळ्या आदी जलपक्ष्यांची छायाचित्रे काढण्यात आली. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात धरणनिर्मितीपासून दरवर्षी शंभराहून अधिक प्रजातींच्या परदेशी पक्षी हजारोंच्या संख्येने हिवाळी पाहुणे म्हणून येतात.

शासनदरबारी पाठपुरावा करू : गुणाजीउजनी जलाशय परिसराचे पक्षी अभयारण्य बनविण्यासाठी आपण शासनदरबारी पाठपुरावा करु, असेही एकेकाळी महाराष्ट्र राज्य वनविभागाचे ब्रॅन्ड अ‍ॅम्बेसिडर म्हणून कर्तव्य बजावलेले गुणाजी यावेळी म्हणाले. 

 

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणMilind Gunajiमिलिंद गुणाजी