युजीसीच्या शिष्यवृत्तींमध्ये घसघशीत वाढ
By Admin | Updated: December 21, 2014 01:40 IST2014-12-21T01:40:04+5:302014-12-21T01:40:04+5:30
विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोळा प्रकारच्या शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने जवळपास ५० टक्कयांनी वाढ केली आहे.

युजीसीच्या शिष्यवृत्तींमध्ये घसघशीत वाढ
वाशिम : विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वतीने उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या सोळा प्रकारच्या शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने जवळपास ५० टक्कयांनी वाढ केली आहे. डिसेंबरपासून याची अंमलबजावणीदेखील सुरू झाली आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून (युजीसी) निवृत्त विद्वान प्राध्यापक, बेरोजगार महिला, डॉ. राधाकृष्णन मानवता व सामाजिक शास्त्र आणि भाषा, स्वामी विवेकानंद समाजशास्त्र आदी प्रकारच्या शिष्यवृत्तींचा यामध्ये समावेश आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने या शिष्यवृत्तींमध्ये यंदापासून घसघशीत वाढ केली आहे. याचा फायदा उच्च शिक्षण घेणाऱ्या गुणवंत तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना होणार आहे. निवृत्त झालेल्या विद्वान प्राध्यापकांचा शैक्षणीक क्षेत्रात उपयोग करुन घेण्याच्या उद्देशाने त्यांना देण्यात येणारी शिष्यवृत्ती दरमहा वीस हजारावरुन एकतीस हजार रुपये करण्यात आली आहे.
बेरोजगार महिलांची शिष्यवृत्ती २५ हजार रूपयांवरून ३८,८०० रूपये करण्यात आली आहे. डॉ. राधाकृष्णन मानवता व सामाजिक शास्त्र आणि भाषा या विषयांसाठी देण्यात येणारी २५ हजार रूपयांची शिष्यवृत्ती आता ३८ हजार ८०० रूपये करण्यात आली आहे. स्वामी विवेकानंद एकुलत्या मुलीसाठी सजामशास्त्र विषयासाठी देण्यात येणारी ८ हजार रूपयांची शिष्यवृत्ती १२ हजार ४०० रुपये, विज्ञान मानवता, सामाज शास्त्र शिष्यवृत्ती १६ हजार रूपयांवरून २५ हजार रुपये, परदेशी विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी १२ हजार रूपयांची शिष्यवृत्ती १८ हजार ६०० रूपये, मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी पदव्युत्तर व्यावसायीक शिक्षणासाठी देण्यात येणारी शिष्यवृत्ती पाच हजार रूपयांवरून सात हजार ८०० रुपये, गेट, जीपॅट पात्र विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान, अभियांत्रीकी आणि औषध निर्माण शाखेच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी देण्यात येणारी ८ हजार रूपयांची शिष्यवृत्ती आता १२ हजार ४०० रुपये करण्यात आली आहे. इंदिरा गांधी शिष्यवृत्ती मध्येही ११०० रूपयांची वाढ करण्यात आली आहे. पूर्वी ही शिष्यवृत्ती दरमहा दोन हजार रूपये होती. आता तीन हजार शंभर रूपये करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)
च्पूर्वी ही शिष्यवृत्ती दरमहा दोन हजार रूपये होती. आता तीन हजार शंभर रूपये करण्यात आली आहे. वाढीव शिष्यवृत्ती योजनेची अंमलबजावणी डिसेंबर, महिन्यापासून सुरू झाली असुन राज्यातील सर्व विद्यापीठांतील विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होणार आहे. शिष्यवृत्तींमध्ये मानव संसाधन विकास मंत्रालयाने जवळपास ५० टक्कयांनी वाढ केली आहे.