शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
2
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
3
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
4
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
5
इराण-इस्रायल तणाव वाढला; कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या! पेट्रोल-डिझेल महागणार?
6
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
7
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
8
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
9
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
10
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
11
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
12
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
13
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
14
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
15
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
16
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
17
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
18
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
19
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
20
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!

उद्धवसेनेचे अनिल परब आहेत ३० कोटींचे धनी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 08:30 IST

परब यांच्याकडे १७ कोटी ९८ लाख १३ हजार, तर पत्नीकडे १ कोटी ६३ लाख ४० हजारांची जंगम मालमत्ता आहे.

नवी मुंबई : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघासाठी उद्धवसेनेचे अनिल परब यांनी सोमवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. एकूण संपत्ती ३० कोटी रुपये असल्याचे विवरण त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत दिले आहे. त्यांच्याकडे २ लाख ८१ हजार ७४२ रुपयांची, तर पत्नी सुनीता परब यांच्याकडे १ लाख ४२ हजारांची रोकड आहे.

परब यांच्याकडे १७ कोटी ९८ लाख १३ हजार, तर पत्नीकडे १ कोटी ६३ लाख ४० हजारांची जंगम मालमत्ता आहे. परब यांच्याकडे ९ कोटी ४२ लाख ६८ हजार रुपयांची आणि पत्नीकडे २ कोटी ४८ लाख पाच हजार रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्याकडे दोन चारचाकी गाड्या आहेत. त्यांची किमत ५० लाख १७ हजार रुपये, तर पत्नी सुनीता परब यांच्याकडेसुद्धा दोन आलिशान गाड्या आहेत. त्यांची किमत ३१ लाख ९५ आहे.

दाेघांकडे जवळपास एक कोटी दहा लाखांचे दागिने आहेत. विविध बँक खाते आणि ठेवीच्या स्वरूपात ८ कोटी २४ लाख २५ हजार रुपये आहेत. कर्जत येथे शेतजमीन, मुंबईच्या विविध भागात दुकाने आणि सदनिका त्यांच्या नावावर आहेत. परब यांच्यावर ४ कोटी ६ लाख ४२ हजार रुपयांचे, तर त्यांच्या पत्नीच्या नावावर ८ लाख ९५ हजार रुपयांचे कर्ज असल्याचे प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

विविध स्वरूपाचे २४ गुन्हेअनिल परब यांच्यावर विविध पोलिस ठाण्यांत विविध स्वरूपाच्या २४ गुन्ह्यांची नोंद आहे.  अनधिकृत बांधकाम, हिंसा, प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे आदी स्वरूपाच्या गुन्ह्यांचा समावेश आहे.  यापैकी १४ गुन्ह्यांत निर्दोष मुक्तता केली असून, उर्वरित खटले सुरू असल्याचे परब यांनी प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहे.

टॅग्स :Anil Parabअनिल परबVidhan Parishadविधान परिषद