शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
6
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
7
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
8
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
9
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
10
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
11
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
12
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
13
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
14
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
15
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
16
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
17
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
18
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
19
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
20
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे उद्या शिवसैनिकांना देणार कानमंत्र; आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 1:06 PM

Uddhav Thackeray : आता बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय कानमंत्र देणार आणि काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

- अल्पेश करकरे

मुंबई :  शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे. जयंतीदिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत उद्या संवाद साधणार आहेत. हा संवाद ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल, अशी माहिती आहे. मात्र आता बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय कानमंत्र देणार आणि काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे .

उद्धव ठाकरे उद्या काय बोलणार? उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी संवाद साधतील, त्यावेळी कोणत्या मुद्द्यांवर संवाद साधतील आणि काय मार्गदर्शन करतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. यामध्ये उद्धव ठाकरे हे आगामी मुंबई महापालिका निवडणूक,  शिवसेनेची आगामी निवडणुकांमधील वाटचाल आणि महाविकास आघाडी सरकारची कामगिरी या विषयावर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार असल्याचे म्हटले जात आहे. उद्धव ठाकरे या संवादाच्या माध्यमातून शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या निमित्तानं कानमंत्र देणार अशी माहिती मिळत आहे. तसेच गेल्या दोन वर्षात काय काम जनतेसाठी करण्यात आली, याविषयी आणि पक्षसंघटन कशाप्रकारे मजबूत करून पुढे आगामी सर्वच निवडणुकांमध्ये कसा विजय मिळवता येईल, या विषयी मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. पक्षात होणारे मतभेद तसेच विविध चर्चा याविषयी देखील उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतील. तसेच महत्त्वाचे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची उद्या जयंती आहे, याच निमित्ताने बाळासाहेबांचे विचार देशभर कसे पोहोचवता येतील याविषयी उद्धव ठाकरे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे.

दरवर्षी मोठी गर्दी होतेय, पण...शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी शिवसैनिक मोठ्या प्रमाणात मुंबईला हजेरी लावत असतात. शिवतीर्थावरील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळी अभिवादन करण्यासाठी लाखो शिवसैनिक आणि शिवप्रेमींचा जनसागर मुंबईत येत असतो. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचे आवाहन राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेने केले आहे. त्यामुळे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ऑनलाईन संवादाद्वारे शिवसैनिकांशी संवाद करतील. हा संवाद 23 जानेवारी रात्री आठ वाजता झूम वरून साधणार आहेत आहेत.

आगामी निवडणुकांसाठी उद्याचा संवाद महत्त्वाचा असेलउद्या पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे शिवसैनिकांना मार्गदर्शन करतील. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर त्यांनी बऱ्याच दिवसांपासून शिवसैनिकांशी संवाद साधलेला नाही. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त उद्धव ठाकरे शिवसैनिकांशी ऑनलाईन संवाद साधतील. या संवादाकडे तमाम शिवसैनिकांचे लक्ष लागले आहे. मात्र आगामी निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे शिवसैनिकांना कानमंत्र देणार असल्याची माहिती शिवसेना सुत्रांनी दिली आहे, त्यामुळे उद्याचा मुख्यमंत्र्यांचा कार्यकर्त्यांशी असणारा संवाद महत्त्वाचा असणार आहे. राज्यात येत्या काळात मुंबई महापालिकेसह अनेक महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत. जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांच्या निवडणुका येत्या काळात पार पडतील. यापार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे शिवसैनिकांना मार्गदर्शन करुन आगामी निवडणुकांसाठी कानमंत्र देणार आहेत, जेणेकरून महाराष्ट्रात आगामी निवडणुकीच्या दृष्टीने शिवसेना घराघरात आणि स्थानिक पातळीवर ही सत्तेत येईल.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना