शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

"उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे अनेकांची हातभर ...."; संजय राऊतांचा भाजपावर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 11:48 IST

या देशात लोकशाहीपद्धतीने आंदोलन होऊ देणार नसतील तर नरेंद्र मोदींनी राजघाटावरून लोकशाही संपली आणि हुकुमशाही सुरू झालीय हे जाहीर करावे असं राऊत म्हणाले.

मालेगाव - राहुल गांधी यांची खासदारकी रद्द केली. त्याविरोधात विरोधी पक्ष एकवटले आहेत. उद्धव ठाकरे हे विरोधी पक्षातील प्रमुख चेहरा आहेत. त्यामुळे मालेगावच्या आजच्या सभेत उद्धव ठाकरे या प्रकरणावर काय बोलतात याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे असं विधान ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केले आहे. 

संजय राऊत म्हणाले की, या मालेगावच्या सभेला सर्व जातीधर्मातील लोक येतील. हे संमिश्र असे शहर आहे. प्रत्येकाने या सभेला यावे. हा देश सगळ्यांचा आहे. या देशाची अखंडता, एकता कायम राहावी यासाठी शिवसेनेने सदैव प्रयत्न केलेला आहे. मालेगावच्या सभेला भाड्याने लोक येणार नाहीत. नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्या हुकुमशाहीविरोधात प्रत्येक विरोधी पक्षाने ठोस भूमिका घेतली पाहिजे असं त्यांनी सांगितले. 

तसेच या देशात लोकशाहीपद्धतीने आंदोलन होऊ देणार नसतील तर नरेंद्र मोदींनी राजघाटावरून लोकशाही संपली आणि हुकुमशाही सुरू झालीय हे जाहीर करावे. राजघाट हे शांतताप्रिय आंदोलनासाठी प्रसिद्ध आहे. महात्मा गांधींच्या समाधीस्थळावरून या देशातील हुकुमशाहीविरोधात अनेक आंदोलन झाले. राजघाट हे सगळ्यांसाठी प्रेरणादायी स्थान आहे. तिथे विरोधकांना जाऊ दिले नसेल तर या देशाचे भवितव्य कठीण आहे असा आरोप खासदार संजय राऊत यांनी केला. 

दरम्यान, या देशात पक्षांतर करणारे १६ आमदार अपात्र ठरत नाहीत. या देशात निवडणूक आयोग बेईमानांच्या गटाला खरी शिवसेना म्हणून मान्यता देते. पण राहुल गांधींना २४ तासांत अपात्र केले जाते. देशात २ वेगवेगळे कायदे आहे. भाजपा-बेईमानांसाठी वेगळा कायदा आणि आमच्यासारख्या लोकांसाठी वेगळा कायदा आहे. सर्वोच्च न्यायालय १६ आमदारांना अपात्र ठरवल्याशिवाय राहणार नाही असा दावा संजय राऊत यांनी केला. 

उर्दुवर देशात बंदी आहे का?उर्दू या देशाची भाषा नाही का? देशात उर्दूवर बंदी आहे का? कालच कुणीतरी जावेद अख्तरांचे कौतुक केले, आम्हीही केले. पाकिस्तानात जाऊन या देशाची भूमिका मांडणारी भाषा ही सुद्धा उर्दू आहे. ज्या जावेद अख्तर, गुलजार यांचे कौतुक करते ते आजही त्यांचे लिखाण उर्दूमध्ये करतात. हा जो काही प्रकार सुरू आहे तो लोकांचे लक्ष भरकटवण्यासाठी आहे. उद्धव ठाकरेंच्या सभेमुळे अनेकांची हातभर फाटलीय असं सांगत संजय राऊतांनी मालेगावमध्ये उर्दू भाषेत लागलेल्या बॅनर्सचे समर्थन केले. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतBJPभाजपाUddhav Thackerayउद्धव ठाकरे