शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
2
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
3
“१०० टक्के माझ्या वॉर्डातून लढणार, ठाकरे बंधू १३० पेक्षा जास्त जागा जिंकणार”: किशोरी पेडणेकर
4
Shiv Sena UBT MNS Alliance: सध्या मुंबईपुरती उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा, जागावाटपावर सस्पेन्स; इतर महापालिकांचे काय?
5
बापरे! करोडपती सरकारी अधिकारी, ६२ कोटींची मालमत्ता, आलिशान फ्लॅट्स अन् रोख रक्कम; तेलंगणा उपपरिवहन आयुक्तांच्या साम्राज्याचे गुपिते उघड
6
"तेव्हा बडव्यांनी घेरलं होतं, मग आता हातमिळवणी कशी?" शेलारांचा राज ठाकरेंना रोखठोक सवाल!
7
Travel : कुठे आहे सांता क्लॉजचे खरेखुरे गाव, जिथे रोजच साजरा होतो ख्रिसमस? तुम्हीही जाऊ शकता फिरायला!
8
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
9
ठाकरे बंधूंची युती घोषित; पाहा, राज-उद्धव यांच्या ऐतिहासिक पत्रकार परिषदेतील १० ठळक मुद्दे
10
Tata Nexon EV खरेदी करायची आहे? किती करावं लागेल डाऊनपेमेंट, पाहा EMI चं संपूर्ण गणित
11
'धुरंधर'नंतर 'दृश्यम ३'मध्ये दिसणार होता अक्षय खन्ना, पण अचानक सोडला सिनेमा? कारण...
12
“मुंबईचे लचके तोडले जातायत, गुजरातच्या दावणीला मुंबईला बांधले जातेय”: विजय वडेट्टीवार
13
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
14
BMC Election: "ते रंग बदलणाऱ्या सरड्यासारखे..." ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर बावनकुळेंचा प्रहार!
15
काँग्रेस-उद्धवसेनेचे फाटले! उद्धव ठाकरेंनी 'मविआ'च्या शक्यतांना दिला पूर्ण विराम, पवारांच्या राष्ट्रवादीबद्दल काय बोलले?
16
Video: जम्मू-कश्मीरच्या अनंतनागमध्ये बिबट्याचा धुमाकूळ; CRPF कॅम्पमध्ये घुसून जवानावर हल्ला
17
ढासू परतावा...! : या SME स्टॉकनं ३ महिन्यांत दिला 225% हून अधिक परतावा, लोकांना केलं मालामाल; केडियालांकडे तब्बल 393100 शेअर
18
बंडखोरीच्या भीतीनं पक्षांची गुपित रणनीती, जागावाटपाचा तिढा सुटेना; भाजपात इच्छुकांची गर्दी
19
आता जर चुकाल तर संपाल, मराठी माणसांना आवाहन; उद्धवसेना-मनसे युतीची अधिकृत घोषणा
20
४ दिवसांपासून बुलेट ट्रेनच्या स्पीडनं पळतोय 'हा' शेअर; सरकारच्या घोषणेचा परिणाम, तुमच्याकडे आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

असे आहे उद्धव ठाकरे यांचे सुरुवातीचे मंत्रिमंडळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2019 06:01 IST

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले.

महाराष्ट्राचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. उद्धव ठाकरे आता महाराष्ट्राचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील, छगन भुजबळ आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात व नितीन राऊत यांनी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह या सर्वांना शपथ दिली. या मंत्र्यांचा अल्पपरिचय पुढील प्रमाणे...एकनाथ शिंदेशिवसेना । कोपरी - पाचपाखाडी (ठाणे)राजकीय कारकिर्दवय : ५५ । शिक्षण : एफवायबीएठाणे जिल्ह्यात१९८० च्या दशकात शिवसेनेच्या माध्यमातून समाजकारणाला सुरुवात केली. १९८४ मध्ये किसननगर येथे शाखाप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झाली. १९९७ साली महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यानंतर, २००१ मध्ये सभागृहनेतेपदी निवड झाली. सलग तीन वर्षे त्यांनी हे पद सांभाळले. २००४ मध्ये ठाणे विधानसभा मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून विजयी, २००५ मध्ये पुन्हा त्याच मतदारसंघात आमदार, २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्याने ते कोपरी-पाचपाखाडी मतदारसंघातून आमदार झाले. २०१४ मध्ये त्यांनी विजयाची हॅट्ट्रिक साधल्याने विरोधी पक्षनेते म्हणून निवड झाली. तर, डिसेंबर २०१४ मध्ये कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ, एमएसआरडीसीचे मंत्री म्हणून कार्यभार स्वीकारला. तसेच ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांनी भूषविले. जानेवारी २०१९ मध्ये आरोग्यमंत्रीपदी निवड, तर नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी विजयी पताका रोवली.सुभाष देसाईशिवसेना । विधान परिषद। मुंबईराजकीय कारकिर्दवय : ७७ । शिक्षण : दहावीशिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत कार्यरत. शिवसेनेत प्रवक्ते, सरचिटणीस ते नेते असा प्रवास. मितभाषी नेते म्हणून परिचित. दैनिक सामना आणि मार्मिकचे प्रकाशक. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उद्योगमंत्री. १९९०, २००४ आणि २००९ मध्ये गोरेगाव विधानसभा मतदारसंघातून विधानसभेवर निवडून आले. २०१६मध्ये विधान परिषदेवर निवड. २००९ ते २०१४ या काळात शिवसेनेचे विधानसभेतील गटनेते. ४५ वर्षांपूर्वी गोरेगावच्या सामाजिक व सांस्कृतिक प्रगतीसाठी विविध योजनांच्या माध्यमातून समाजकार्यास प्रारंभ केला. बाळासाहेबांच्या नेतृत्वामुळे, त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन १९७२ साली त्यांनी प्रबोधन-गोरेगाव या संस्थेची स्थापना. प्रबोधनने गोरेगावला वेगळीच ओळख दिली. या समाजोपयोगी संस्थेने वक्तृत्व स्पर्धा, क्रीडा मेळावे, एकांकिका स्पर्धा, व्याख्यानमाला अशा सांस्कृतिक, क्रीडा आणि आरोग्यविषयक उपक्रमांसह सामाजिक प्रकल्पही उभे केले.जयंत पाटीलराष्टÑवादी । इस्लामपूर (सांगली)राजकीय कारकिर्दवय : ५७ । शिक्षण : बी. ई. सिव्हिलइस्लामपूर (पूर्वीचा वाळवा) मतदारसंघातून १९९0 मध्ये काँग्रेसकडून ते पहिल्यांदा आमदार झाले. १९९५ ते ९८ दरम्यान डेक्कन शुगर असोसिएशन आणि राज्य सहकारी साखर कारखाना संघाचे ते अध्यक्ष होते. १९९९ मध्ये ते राष्टÑवादीत आले. ते आजअखेर सलग सातवेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी ३० वर्षे आमदारकी आणि १५ वर्षे मंत्रीपद भूषविले. त्यांच्याकडे वयाच्या ३८ व्या वर्षी राज्याच्या अर्थमंत्री पदाची धुरा आली. सलग नऊ अर्थसंकल्प सादर करण्याचा विक्रम केला. गृह, ग्रामविकास, अर्थ अशा महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी पेलली. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर त्यांच्याकडे राज्याच्या गृहखात्याची जबाबदारी आली होती. २०१४ पासून ते विधानसभेतील राष्टÑवादीचे गटनेते असून, सध्या राष्टÑवादीचे प्रदेशाध्यक्षपदही त्यांच्याकडे आहे. शरद पवार यांचे ते निष्ठावान आणि विश्वासू सहकारी आहेत. संयमी, मुरब्बी, उच्चशिक्षित, तंत्रस्नेही नेता अशी त्यांची ओळख आहे.छगन भुजबळराष्टÑवादी कॉँग्रेस। येवलाराजकीय कारकिर्दमुंबई महापालिकेत नगरसेवकपदापासून ते महाराष्टÑाच्या उपमुख्यमंत्रिपदापर्यंतची राजकीय कारकीर्द घडविणारे छगन भुजबळ एक आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जाते. शिवसेना, कॉँग्रेस आणि राष्टÑवादी असा पक्षीय प्रवास करणारे भुजबळ १९७३मध्ये मुंबई महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून गेले. त्यांनी दोन वेळा मुंबईचे महापौरपदही भूषविले. १९८५ आणि १९९० मध्ये छगन भुजबळ मुंबईतील माझगावमधून विधानसभेवर निवडून गेले. १९९१ मध्ये शिवसेनेला सोडचिठ्ठी देत कॉँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि कॉँग्रेस सरकारमध्ये महूसल, गृहनिर्माण खात्याचा पदभार सांभाळला. १९९६ मध्ये विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद भूषविले. १९९९ आणि २००८ मध्ये उपमुख्यमंत्रिपदाचा दोनदा मान तर २००४ ते २०१४ या कालावधीत कॉँग्रेस आघाडी सरकारमध्ये सार्वजनिक बांधकाम, पर्यटन या खात्याचा पदभार सांभाळला. २०१९ मध्ये येवला मतदारसंघातून सलग चौथ्यांदा विजय.बाळासाहेब थोरातकाँग्रेस । संगमनेर (अहमदनगर)राजकीय कारकिर्दवय : ६६ । शिक्षण : बी.ए., एल.एल.बी.काँग्रेस प्रदेशाध्यक्ष असलेले बाळासाहेब थोरात अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर मतदारसंघातून आठव्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. सहकाराचा वारसा व स्वच्छ प्रतिमा असलेले थोरात हे काँग्रेसचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. अखिल भारतीय काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांचे ते विश्वासू आहेत. २०१७ मध्ये गुजरात विधानसभेचे प्रभारी म्हणून त्यांनी चोख कामगिरी बजावली. यामुळेच २०१८ मध्ये त्यांची काँग्रेसच्या केंद्रीय कार्यकारिणीवर निवड झाली. काँग्रेस सरकारमध्ये १५ वर्षे मंत्री राहिलेल्या थोरात यांच्याकडेच सध्या महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्षपद आहे. पक्षाचे विधीमंडळ नेतेपदही त्यांच्याकडे आहे. शांत व संयमी स्वभाव असलेले थोरात यांची अजातशत्रू व्यक्तिमत्त्व म्हणूनच संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे. लोकसभा निवडणुकीनंतर त्यांची प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली. २०१४ च्या विधानसभेपेक्षा त्यांनी जास्त आमदार निवडून आणले. पाटबंधारे, कृषी, शिक्षण, महसूल ही खाती त्यांनी संभाळली आहेत.डॉ. नितीन राऊतकाँग्रेस । उत्तर नागपूरराजकीय कारकिर्दवय : ६७ । शिक्षण : एम. ए. पीएचडी.आ. नितीन राऊत हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आहेत. प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष व अ.भा. काँग्रेस समितीच्या अनुसूचित जाती आघाडीचे ते राष्ट्रीय अध्यक्षही आहेत. विदर्भातील मागासवर्गीय नेता म्हणून त्यांची ओळख आहे. आंबेडकरी चळवळीचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उत्तर नागपूर विधानसभा मतदार संघातून २०१४ चा अपवाद वगळता ते सातत्याने निवडून आले आहेत. आमदार म्हणून त्यांची ही चौथी टर्म असून, मंत्री म्हणून तिसरी टर्म आहे. आघाडी सरकारमध्ये ते २००७-२००९ दरम्यान गृहराज्यमंत्री होते. तर २००९ ते २०१४ पर्यंत ते पशुसंवर्धन, रोजगार हमी व जलसंवर्धन मंत्री होेते. एक अभ्यासू नेते म्हणून ते ओळखले जातात. ते ज्येष्ठ नेते असून सामाजिक कार्यातही ते अग्रेसर असतात. संकल्प या त्यांच्या एनजीओतर्फे अनेक गरजू लोकांना मदत केली जाते. दीक्षाभूमीवर धम्मचक्र प्रवर्तनदिनी देशभरातून येणाºया हजारो अनुयायांना त्यांच्या ‘संकल्प’तर्फे भोजनदान दिले जाते. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरे