शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

'देशात थापा मारून झाल्या,आता परग्रहावर थापा मारायला जातील'- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2018 17:17 IST

मोदींच्या घराभोवती उडती तबकडी फिरत असल्याच्या बातमीची खिल्ली त्यांनी उडविली.

मुंबई- 'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी थापा मारूनच सत्ता आणली आहे. देशात थापा मारून झाल्या, आता परग्रहावर थापा मारायला जातील. मोदींच्या घरावर तबकडी फिरते म्हणजे आता त्यांचे परग्रहावर दौरे सुरू होतील, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींच्या घराभोवती उडती तबकडी फिरत असल्याच्या बातमीची खिल्ली त्यांनी उडविली. शिवसेनेच्या ५२व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरे बोलते होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या परदेश दौऱ्यावर व विकासाच्या मुद्द्यावर सडकून टीका केली. 

काही दिवसांपूर्वी नरेंद्र मोदींनी विराट कोहलीचं फिटनेस चॅलेन्ज मान्य करत त्यांचा व्यायाम करतानाचा एक व्हिडीओ पोस्ट केला होता. या व्हिडीओवरही उद्धव ठाकरेंनी आपल्या भाषणातून निशाणा साधला. 'सध्या जो फिटनेस फंडा सुरू आहे तो मीही करून पाहिला पण माझी पाठ धरली. मात्र, मी यांची पाठ काही सोडणार नाही', अशी टिपण्णी उद्धव ठाकरे यांनी केली. 

बुलेट ट्रेन व नाणार प्रकल्पाला असलेल्या विरोधाचा पुनरूच्चार उद्धव ठाकरेंनी केला. राज्याच्या विकासासाठी माझ्या निसर्गसौंदर्य लाभलेल्या कोकणाचं नुकसान मी होऊ देणार नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाShivsena Anniversaryशिवसेना वर्धापनदिनNarendra Modiनरेंद्र मोदी