उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक, दोन जखमी

By Admin | Updated: May 5, 2016 13:07 IST2016-05-05T12:46:46+5:302016-05-05T13:07:53+5:30

दुष्काळी दौ-यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण जखमी झाले आहेत

Uddhav Thackeray's car hit a two-wheeler and two wounded | उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक, दोन जखमी

उद्धव ठाकरेंच्या ताफ्यातील गाडीची दुचाकीला धडक, दोन जखमी

>ऑनलाइन लोकमत - 
बीड, दि. 05 - दुष्काळी दौ-यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीने दुचाकीला दिलेल्या धडकेत दोन जण जखमी झाले आहेत. यात एका लहान मुलाचा समावेश आहे. जखमींवर बीडच्या जिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.
 
दुष्काळी दौ-यावर असलेले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव  ठाकरे बीड तालुक्यातील चौसाळ्याहून दुष्काळी पाहणी करून बीडकडे येत असताना खजाना बावडी जवळ त्यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीने ( एम एच २३ एफ : ०१००) ने बीडहून मांजरसूंब्याकडे जाणा-या दुचाकीला धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दिलीप वाघ ( वय ४० रा.खडकी घाट)  व शुभम दिलीप वाघ ( वय १२)  हे दोघे पितापुत्र जखमी झाले आहेत. शुभम याच्या चेह-याला व पायाला मार लागला आहे तर दिलीप यांच्या उजव्या हाताला मार लागला असून फ्रँक्चर झाला आहे.. ताफ्यातच असलेल्या चौसाळा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रूग्णवाहिकेने जखमींना उपचारासाठी जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वार्ड क्रमांक पाच मध्ये त्यांच्यावर उपचार करण्यात येत असून प्रक्रूती स्थिर असल्याची माहिती वैद्यकीय अधिका-यांनी दिली आहे.

Web Title: Uddhav Thackeray's car hit a two-wheeler and two wounded