शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र लुटून खा... आम्ही...! मंत्री सरनाईकांनी २०० कोटींची जमीन ३ कोटीत घेतली", वडेट्टीवारांचा गंभीर आरोप
2
“प्रत्येक भारतीयाला वंदे भारत ट्रेनचा अभिमान”: PM मोदी, वाराणसीतून ४ नव्या सेवांचे लोकार्पण
3
Video - काळाचा घाला! उत्तर प्रदेशच्या शामलीत भीषण अपघात, ४ मित्रांचा मृत्यू, कारचा चक्काचूर
4
खळबळजनक! अनिलशी लग्न, आकाशशी अफेअर, नशेच्या गोळ्या...; काजलने नवऱ्याचा काढला काटा
5
“NDA म्हणजे पांडव, निवडणुकीच्या कुरुक्षेत्रावर कौरवांचा पराभव करा”; एकनाथ शिंदेंचे आवाहन
6
Ambadas Danve : "अजित दादांचे वक्तव्य म्हणजे ‘जोक ऑफ द डे’", अंबादास दानवेंचा खोचक टोला
7
बुलिंग, शाळेचं दुर्लक्ष अन् चौथ्या मजल्यावरुन उडी... अमायराला कशाचा झाला त्रास?, आईचा मोठा खुलासा
8
Tarot Card: मध्यम फलदायी आठवडा, संयमाचा कस लागेल; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
9
“जमीन घोटाळाप्रकरणी अजित पवारांचा राजीनामा घेणे योग्य नाही”; भाजपा नेत्यांनी केली पाठराखण
10
मल्याळी असूनही स्वामींचा भक्त आहे जयवंत वाडकरांचा होणारा जावई; म्हणाले, "तो दर महिन्याला..."
11
दिल्ली विमानतळावरील तांत्रिक समस्या पूर्णपणे दूर, विमानसेवा पुन्हा पूर्ववत; AAI ची माहिती, नेमकं घडलं काय?
12
Travel: पिकनिक प्लॅन करताय? महाराष्ट्रात 'या' ठिकाणी अनुभवा हॉट एअर बलून राईडचा थरार!
13
घरात पाणी येत नसल्याने दिव्यांग वयोवृद्धाचा टेरेसवरून उडी मारून जीवन संपवण्याचा प्रयत्न
14
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
15
रिश्ता पक्का! कथित बॉयफ्रेंडसोबत समंथाने शेअर केला रोमँटिक फोटो, दिसतेय हॉट; म्हणाली...
16
अभिनेते जयवंत वाडकरांची लेक स्वामिनीचा थाटामाटात झाला साखरपुडा, कोण आहे होणारा नवरा?
17
अग्रलेख: उठो ‘पार्थ’, स्वच्छता हाच धर्म! महायुती सरकारच्या प्रतिमेवर शिंतोडे उडताहेत...
18
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
19
विशेष लेख: नक्षलमुक्त भारताकडे निर्णायक पावले पडतात, तेव्हा...
20
टीम इंडियाला मालिका विजयाची संधी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध अखेरचा टी२० सामना आज

Uddhav Thackeray: 'मुंबई आणि कमळाबाईचा काय संबंध? ही आमची मातृभूमी', उद्धव ठाकरे कडाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2022 20:25 IST

Uddhav Thackeray: 'ही लोक आमच्या वंशावर आमच्या घराण्यावर टीका करत आहेत. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे.'

मुंबई: महाविकास आघाडी सरकार कोसळल्यापासून शिवसेना आणि भाजपमध्ये तणाव वाढला आहे. यातच आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जाहीर सभेतून भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. सध्या राज्यात बाप पळवणारी टोळी फिरतीय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. तसेच, ठाकरेंच्या घरावर टीका करणाऱ्यांनाही जोरदार प्रत्युत्तर दिले.

संबंधित बातमी-  'राज्यात सध्या बाप पळवणारी टोळी फिरतीये', उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीसांवर घणाघात

उद्धव ठाकरे म्हणाले, 'मुंबईचे लचके तोडण्यासाठी गिधाडांची औलाद फिरू लागली आहे. देशाचे गृहमंत्री अमित शहा येऊन गेले. निवडणुक आल्यावरच तुम्ही येता, तुमच्यासाठी मुंबई फक्त जमिनीचा तुकडा असेल. पण, आमच्यासाठी ही मातृभूमी आहे. मुंबादेवी म्हणजेच मुंबई आमची आई आहे. आजकाल आईला गिळणारी लोकही येत आहे. मुंबई आणि कमळाबाईचा संबंध काय? मी पहिल्यांदा कमळाबाईवर बोलतोय. हा शब्द माझा नाही, बाळासाहेबांनी दिलाय. मुंबईवर चालून येण्याचे धाडस करू नका. दसऱ्याला यांची लख्तरे काढणारच आहे,' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. 

'आमच्या घराण्यावर टीका कराल तर...'उद्धव ठाकरे पुढे म्हणतात, 'ही लोक आमच्या वंशावर आमच्या घराण्यावर टीका करत आहेत. मला माझ्या घराण्याचा अभिमान आहे. माझे आजोबा संयुक्त महाराष्ट्र समितीत सर्वात पुढे होते, मुंबई महाराष्ट्राला मिळालीच पाहिजे, यासाठी आम्ही लढलो. तेव्हा जनसंघ समिती फोडून बाहेर पडला. ही त्यांचीच औलाद आहेत,' अशी जहरी टीका त्यांनी यावेळी केली. 

'युतीत 25 वर्षे सडली''दुर्दैवाने आपण त्यांच्यासोबत युती केली. मी पुन्हा बोलतोय, 25 वर्षे युतीमध्ये सडली. ही सगळी नालायक माणसे जोपासली. मेहनत आम्ही घ्यायची आणि फुकत त्यांना द्यायच. आमच्या जिवावर वरती पोचलात आणि आम्हाला लाथा मारताय. वंशवादावर टीका करणार असाल, तर तुमचा वंश कोणता, त्यावर आधी बोला,' अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाAmit Shahअमित शाह