Uddhav Thackeray: मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले, ‘’आता जिंकेपर्यंत लढायचं, एकच विचारतो…’’
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2023 20:28 IST2023-03-26T20:27:37+5:302023-03-26T20:28:10+5:30
Uddhav Thackeray:आज माझ्या हातात काहीही नाही. तरीही एवढी गर्दी झाली आहे. ही सगळी माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे. आता एकच ब्रिदवाक्य आता जिंकेपर्यंत लढायचं. एकच विचारते जिंकेपर्यंत सोबत राहणार का, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.

Uddhav Thackeray: मालेगावमध्ये उद्धव ठाकरेंचं मोठं विधान, म्हणाले, ‘’आता जिंकेपर्यंत लढायचं, एकच विचारतो…’’
शिवसेनेत फूट पडल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनेविरोधात खेडमध्ये सभा घेतल्यानंतर आज ठाकरे गटाची मालेगाव येथे सभा झाली . या सभेला संबोधित करताना उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीलाच मोठं विधान केलं आहे. आज माझ्या हातात काहीही नाही. तरीही एवढी गर्दी झाली आहे. ही सगळी माझ्या पूर्वजांची पुण्याई आहे. आता एकच ब्रिदवाक्य आता जिंकेपर्यंत लढायचं. एकच विचारते जिंकेपर्यंत सोबत राहणार का, असं आवाहन उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आज माझ्या हातात काही नाही. तरीही एवढी मोठी गर्दी झाली आहे. जनसमुदाय जमला आहे. ही सगळी माझ्या पूर्वजांची पुण्य़ाई आई वडिलांचे आशीर्वाद आहेत. तुम्ही मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी छपथ घेतली. पण मी पुन्हा मुख्यमंत्री होण्यासाठी नाही तर तुमच्या प्रश्नांसाठी उभा आहे. आता एकच ब्रिदवाक्य समोर ठेवा. आता जिंकेपर्यंत लढायचं. आता एकच विचारतो आता जिंकेपर्यंत सोबत राहणार का, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मी खेडच्या सभेत बोललो होतो. जे गद्दार ढेकून आहेत. त्या गद्दार ढेकणांना चिरडायला तोफेची गरज नाही. तुम्ही एवढे जागृत असतानाता काही बोलायची गरजच नाही. आजची सभा पाहिल्यानंतर मी गद्दारांना विचारतो की, शिवसेनेचं काय कमी केलं तुम्ही. तुम्ही नाव चोरलं, चिन्ह चोरलं. पण प्रेम करणारी माणसं चोरता येत नाहीत, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला.