शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी पाठीत खंजीर खुपसला, अमित शहा यांचा घणाघात; विश्वासघात करणाऱ्यांना जागा दाखवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 08:31 IST

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यावर मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या बैठकीत शहा यांनी मार्गदर्शन केले.

मुंबई: उद्धव ठाकरेंनी भाजपचा, जनतेचा विश्वासघात केला; धोका दिला. आयुष्यात सगळे काही सहन करा पण राजकारणात धोका सहन करू नका. आपल्या पाठीत खंजीर खुपसणाऱ्या उद्धव ठाकरेंना जागा दाखवून द्या, असा आदेश देतानाच केंद्रीय गृहमंत्री व भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांनी मुंबई महापालिकेत १५० जागा जिंकण्याचे लक्ष्य मुंबई भाजपला दिले.उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मेघदूत बंगल्यावर मुंबईतील भाजपचे पदाधिकारी, माजी नगरसेवक यांच्या बैठकीत शहा यांनी मार्गदर्शन केले. यावेळी फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार, मंत्री मंगलप्रभात लोढा उपस्थित होते.

धोका देणाऱ्यांना शिक्षा दिलीच पाहिजे२०१९ च्या निवडणूक निकालानंतर अमित शहा यांनी शिवसेनेला मुख्यमंत्रिपद अडीच वर्षे देण्याचा शब्द मोडला, असे कारण देत उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते. मात्र, त्यावेळी नेमके काय घडले याचा खुलासा करीत अमित शहा यांनी ठाकरेंवर हल्लाबोल केला. ते म्हणाले की, राजकारणात अन्यायाला जागा असते, पण धोक्याला अजिबात नाही. ज्यांना धोका सहन करण्याची सवय असते ते आपले स्थान कधीही मजबूत करू शकत नाहीत. जो धोका देतो त्याला शिक्षा दिलीच पाहिजे. उद्धव यांनी आपल्याला धोका दिला. जनमताचा अनादर करून त्यांनी महाविकास आघाडी सरकार बनविले. आता त्यांना जमीन दाखवा. राजकारणात सगळे सहन करा पण धोका सहन करू नका. मोदी-फडणवीसांच्या नावावर मते मागणाऱ्या शिवसेनेने भाजपचा आणि जनतेचाही विश्वासघात केला, असा घणाघातही शहा यांनी केला.

मुंबईवर भाजपचाच झेंडायावेळी फडणवीस, बावनकुळे व शेलार यांची भाषणे झाली. शिंदेंच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या साथीने मुंबई महापालिकेवर भाजपचा झेंडा फडकविल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार व्यक्त करतानाच राज्यातील सत्तांतराचे सर्व श्रेय अमित शहा यांचे असल्याचे फडणवीस म्हणाले.

शिवसेनेने जागा पाडल्याअडीच वर्षे मुख्यमंत्रिपद देण्याचा शब्द मी उद्धव ठाकरे यांना कधीही दिलेला नव्हता, असे सांगतानाच २०१९ मध्ये युती असूनही शिवसेनेने भाजपच्या काही जागा पाडल्या असा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सोमवारी मुंबईत भाजप पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना केला. -वृत्त/महाराष्ट्र

घर के सामने मारा तो...‘कही भी मारा तो चोट लगती ही है, पर घर के सामने मारा तो दिल को चोट लगती है...’ या शब्दांत शहा यांनी मुंबईच्या मैदानातच शिवसेनेला चारीमुंड्या चित करण्याचे आवाहन भाजप नेत्यांना केले. 

टॅग्स :Amit Shahअमित शाहMumbaiमुंबईDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदे