शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray : "बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या"

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2023 16:20 IST

Uddhav Thackeray : शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे.

उद्धव ठाकरे यांनी आज शेतकरी मुद्द्यावर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. शेतकऱ्यांच्या मुद्यावरून मुख्यमंत्र्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. "पंचनाम्याचा खेळ थांबवा, सरसकट मदत द्या" असं म्हणत टीकास्त्र सोडलं. तसेच "बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

"या सरकारने सगळंच विकायला काढलंय, तुम्ही अवयव विकण्याचा अविचार मनात आणू नका! बळीराजा बांधवांनो एकत्र या, घटनाबाह्य सरकारला अन्नदात्याची ताकद दाखवून द्या! दुःखात खचून जाऊ नका, शिवसेना नेहमी तुमच्यासोबत आहे" असं उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना म्हटलं आहे. 

"प्रधानमंत्री फसल योजना हा घोटाळा आहे, पारदर्शकता असेल तर विम्याचे पैसे गेले कुठे? पंचनामे करत बसण्यापेक्षा सरसकट कर्जमाफी द्या, नाहीतर नुकसान भरपाई द्या! माझ्या बळीराजाला न्याय द्या. जबाबदारी घेतली आहेत, तर जबाबदारी पार पाडा. शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा" असं देखील ठाकरेंनी म्हटलं आहे. 

"मुख्यमंत्री, पंतप्रधानांना प्रचार करायला वेळ, शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला कधी येणार?"

उद्धव ठाकरे यांनी याआधी राज्य वाऱ्यावर पडलंय. एक फुल दोन हाफ. दुसरे दोन हाफ कुठेत, कल्पना नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना खोचक टोला लगावला होता. तसेच "मुख्यमंत्री, पंतप्रधानांना इतर राज्यात प्रचार करायला, रेवडी उडवायला वेळ आहे, मग माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला तुम्ही कधी येणार?" असा सवालही विचारला होता. 

"दुसऱ्याच्या राज्यात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री स्वतःचं घर, स्वतःचं राज्य का नाही सांभाळत?, भाजपा इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा! आम्ही महाराष्ट्रात निवडणुकांची वाट बघतोय! तुमच्या ट्रिपल इंजिनमधून थापांचे धूर न सोडता बळीराजाला भरघोस मदत करा! मी शिवसैनिकांना आवाहन करतो. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा, त्यांना दिलासा द्या!" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. 

 

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेFarmerशेतकरी