Uddhav Thackeray : "अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी?"; उद्धव ठाकरेंचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2024 13:48 IST2024-02-10T13:30:22+5:302024-02-10T13:48:55+5:30
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूर्वी गँगवॉर दोन गटांमध्ये व्हायचं, आता सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे असं म्हणत निशाणा साधला आहे.

Uddhav Thackeray : "अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी?"; उद्धव ठाकरेंचा सवाल
मुंबईत ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये अभिषेक घोसाळकर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. अभिषेक हे माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आहेत. याच दरम्यान, हल्लेखोर मॉरिसनेही स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली आहे. यावरून उद्धव ठाकरे यांनी राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पूर्वी गँगवॉर दोन गटांमध्ये व्हायचं, आता सरकारमध्ये गँगवॉर सुरू आहे असं म्हणत निशाणा साधला आहे.
"अभिषेक घोसाळकरवर गोळ्या मॉरिसने चालवल्या की आणखी कुणी चालवल्या? त्या दोघांनाही मारण्याची सुपारी आणखी कुणी दिली होती का?" असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. "अभिषेक घोसाळकर यांची हत्या करण्यात आली. मात्र ज्याने हत्या केली त्यानेही नंतर आत्महत्या केली. हे प्रकरण जेवढं दिसतंय तेवढं सोपं दिसत नाही आहे. सूड भावनेतून माणूस अत्यंत टोकाचं पाऊल उचलतो. त्याने टोकाचं पाऊल उचललं असेल तर त्याने आत्महत्या का केली हा प्रश्न राहतो."
मुंबई । पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांची पत्रकार परिषद । मातोश्री - #LIVEhttps://t.co/XFGwgeYM5a
— Office of Uddhav Thackeray (@OfficeofUT) February 10, 2024
"अभिषेक घोसाळकर आणि मॉरिसचा फेसबुक लाईव्हचा व्हिडीओ समोर आला. यात गोळ्या झाडताना दिसतं. पण कोण झाडतंय हे दिसत नाही. मॉरिसने बॉडीगार्डच्या शस्त्रातून गोळ्या चालवल्या. त्या गोळ्या खरंच त्याने चालवल्या की, आणखी कोणी चालवल्या? त्या दोघांना मारण्याची सुपारी आणखी कोणी दिली होती का? हा एक मोठा प्रश्न मनात आहे" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीकास्त्र सोडलं आहे.
"आम्ही राज्यपालांकडे जाणार नाही, पूर्वीच्या राज्यपालांसोबत त्यांचे फोटो आहेत. माजी राज्यपाल कोश्यारी य़ांच्यासोबत या गुंडाचा सत्कार करताना फोटो आहे. असे गुंडांचे सत्कार राज्यपालांच्या हातून होत असतील, तर कुणाकडे दाद मागायची? कोरोनाच्या काळात ‘मास्क घालणे’ हा उपचार होता, तसा सध्या या सरकारला ‘मत न देणं’ हा त्यावर उपचार आहे. मी मुख्यमंत्री असताना ज्या वेळी पोलिसांवर आरोप झाले, त्यावेळी मी खंबीरपणे महाराष्ट्र पोलिसांसोबत उभा राहिलो होतो" असं देखील उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.