शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray : "मुख्यमंत्री, पंतप्रधानांना प्रचार करायला वेळ, शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला कधी येणार?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 14:39 IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा राज्यातील सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. राज्य वाऱ्यावर पडलंय. एक फुल दोन हाफ. दुसरे दोन हाफ कुठेत, कल्पना नाही असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना खोचक टोला लगावला आहे. तसेच "मुख्यमंत्री, पंतप्रधानांना इतर राज्यात प्रचार करायला, रेवडी उडवायला वेळ आहे, मग माझ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्याच्या पाठीवर हात फिरवायला तुम्ही कधी येणार?" असा सवालही विचारला आहे. 

"दुसऱ्याच्या राज्यात जाण्यापेक्षा मुख्यमंत्री स्वतःचं घर, स्वतःचं राज्य का नाही सांभाळत?, भाजपा इतर राज्यात ज्या थापा मारतंय, त्या आता आवरा! आम्ही महाराष्ट्रात निवडणुकांची वाट बघतोय! तुमच्या ट्रिपल इंजिनमधून थापांचे धूर न सोडता बळीराजाला भरघोस मदत करा! मी शिवसैनिकांना आवाहन करतो. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जा, त्यांना दिलासा द्या!" असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. 

"असंविधानिक मुख्यमंत्री स्वतःचं घर सोडून, दुसऱ्याची घरं धुंडाळतायत. स्वतःच घर न सांभाळता दुसऱ्याच्या घरात डोकावणारे हे भुरटे राज्याला न्याय देऊ शकत नाहीत! मुख्यमंत्र्यांच्या पंचतारांकीत शेती माझ्या गरीब शेतकऱ्याला ही मिळो, ही मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. रामलल्लाच्या दर्शनापेक्षा तुमचं दर्शन शेतकऱ्याला कधी देणार? महाराष्ट्रात निवडणुका आल्यावर जर तुमच्या तिजोरीची दारं उघडणार असतील, तर तोपर्यंत महाराष्ट्राची जबाबदारी कोण घेणार?" 

"ज्यांची कोणावर निष्ठा नाही ते वस्तुनिष्ठ माहिती काय घेणार? आताचं घटनाबाह्य सरकार म्हणजे, दुष्काळातला तेरावा महिना! बळीराजा गारपीट, अवकाळीच्या संकटात असताना जो माणूस बेपर्वाईने प्रचारासाठी दुसऱ्या राज्यात जातो, असा माणूस राज्याचा कारभार करायला नालायक आहे अशा माणसाला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही" असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार