शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात यावे; संजय राऊत यांच्याकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2020 07:30 IST

पंतप्रधान म्हणून मोदींना कायम शुभेच्छा

विशेष प्रतिनिधी ।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रीय राजकारणात जावे, अशा शुभेच्छा देतानाच पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांना शिवसेनेच्या कायमच शुभेच्छा आहेत, असे विधान शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केले.

पत्रकारांशी बोलताना राऊत यांनी, सध्या राष्ट्रीय राजरकारणात नेतृत्वाची पोकळी दिसत असून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून कायम राहत उद्धव ठाकरेंनी राष्ट्रीय राजकारणात उतरावे, असे मत व्यक्त केले. ते म्हणाले की, आज ममता बॅनर्जी आणि आधी चंद्राबाबू नायडू यांनी तसे केलेले आहे. राष्ट्रीय राजकारणात नजीकच्या काळात काही महत्त्वाच्या घडामोडी होऊ शकतात आणि त्यात महाराष्ट्राचे महत्त्व राहावे म्हणून शरद पवार यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरेंचेही राष्ट्रीय राजकारणात राहणे महत्त्वाचे आहे. उद्धव ठाकरेंना आपण पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा देता का, या प्रश्नात राऊत म्हणाले की, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदींना आमच्या कायमच शुभेच्छा आहेत.मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी स्वत: गाडी चालवित असल्याचा आणि उद्धव ठाकरे हे बाजूला बसले असल्याचा फोटो उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टिष्ट्वट केला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता राऊत म्हणाले की, गाड्या पुरविण्याचे काम आम्हीच करतो. कदाचित सरकारची गाडी कशी चाललीय ते पाहताहेत, माझ्या अजित पवारांनाही शुभेच्छा आहेत.

निमंत्रण आल्यास ठाकरेअयोध्येला नक्कीच जातीलअयोध्येतील श्री राम मंदिराच्या भूमिपूजन समारंभास उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले तर उद्धव ठाकरे नक्कीच जातील, असे राऊत यांनी स्पष्ट केले. यावरून अद्याप असे निमंत्रण मिळाले नसल्याचे स्पष्ट झाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेSanjay Rautसंजय राऊत