शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
2
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
3
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
4
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
5
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
6
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
7
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
8
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
9
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
10
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
11
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
12
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
13
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
14
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
15
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
16
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
17
अमेरिकेचा 88 लाखांचा H-1B व्हिसा आजपासून लागू; भारतीयांना मोठा दिलासा...
18
Beed: फटाका विझलाय समजून पुन्हा पेटवायला गेला अन्...; बीडमध्ये सहा वर्षांच्या मुलासोबत भयंकर घडलं!
19
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
20
Alyssa Healy : बॅक टू बॅक सेंच्युरी, तरीही स्टार्कच्या बायकोवर आली बाकावर बसण्याची वेळ; कारण...

"मी शांत आहे, याला माझी कमजोरी समजू नका", उद्धव ठाकरेंचा विरोधकांवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2020 15:12 IST

उद्धव ठाकरे म्हणाले, संक्रमण रोखण्यात लोकांनी मोठे सहकार्य केले आहे, मी सर्वांचे आभार माणतो. आपल्याला कोरोनाला घाबरण्याची आवश्यकता नाही. आपण सावध रहा, आम्ही जबाबदार राहू. आपल्याला आणखी काळजी घ्यावी लागेल. देशात करोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने राज्यातील जनतेशी संवाद साधला.सरकार जनजीवन सुरळित करण्याचा पूर्णपणे प्रयत्न करत आहे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला होणार सुरूवात.

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने राज्यातील जनतेशी संवाद साधला. यावेळी, ठाकरे म्हणाले, राज्यातील जनतेने लॉकडाउनच्या नियमांचे पालन केले आहे. या काळात जनतेने संयम दाखून सरकारला मदत केली. मात्र, अद्यापही कोरोना संकट संपलेले नाही. सरकारकडून जनजीवन सुरळीत करण्याचा पूर्णपणे प्रयत्न सुरू आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले, सध्या राजकारणावर बोलण्याची माझी इच्छा नाही. मात्र, याचा अर्थ असा नाही, की माझ्याकडे उत्तर नाही. महाराष्ट्राची बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. यामुळे, मी महाराष्ट्राच्या बदनामीवर बोलणार आहे.

विरोधकांना टोला -विरोधक म्हणत आहेत, मुख्यमंत्री घराबाहेर पडत नाहीत, त्यांनी घराबाहेर पडावे. मात्र, जेथे तुम्ही पोहोचला नाहीत, अशा ठिकाणीही मी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमाने जाऊन आलो आहे. एवढेच नाही, तर अनेकांशी चर्चाही केली आहे आणि करत आहे, अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी विरोधकांना टोला लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, संक्रमण रोखण्यात लोकांनी मोठे सहकार्य केले आहे, मी सर्वांचे आभार माणतो. आपल्याला कोरोनाला घाबरण्याची आवश्यकता नाही. आपण सावध रहा, आम्ही जबाबदार राहू. आपल्याला आणखी काळजी घ्यावी लागेल. देशात करोनाचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला आहे.

'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेला होणार सुरूवात -उद्धव ठाकरे यांनी सांगितले, की आपण 15 सप्टेंबरपासून एक मोहीम सुरू करत आहोत. जे आपल्या महाराष्ट्रावर प्रेम करतात, त्या सर्व लोकांनी या मोहिमेत आपली जबाबदारी पार पाडावी. महाराष्ट्र आपले कुटुंब आहे आणि ते सुरक्षित ठेवणे आपली जबाबदारी आहे. म्हणूनच आपण या मोहिमेचे नाव 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' असे ठेवले आहे. तसेच मास्क हाच आपला ब्लॅक बेल्ट आहे आणि तोच आपल्याला सुरक्षित ठेवेल, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे -कोरोना काळातही राज्यात साडे २९ लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्त केले. सरकार शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या मागे खंबीरपणे उभे आहे.

राज्यातील साडेसहा लाख कुपोषित बालकांना पुढील वर्षभर मोफत भोजन देणार

शिवभोजन थाळी ५ रुपयात दिली, पावणेदोन कोटी थाळ्या राज्यभरात दिल्या जातात.

कोरोनासाठी ३० लाख ६० हजार बेड्स उपलब्ध आहे, यात ऑक्सिजन, आयसीयू आणि सामान्य बेड्सचा समावेश आहे. जिथे आवश्यकता असेल तिथे बेड्सची संख्या वाढवतो आहे.

औषधांचा पुरवठा करण्यात कमी पडत नाही, अशी कोणतीही बाब शिल्लक ठेवली नाही, जिथे सरकार म्हणून कमी पडलो आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळे नुकसान झालेल्या भागासाठी ७०० कोटी मदत केली आहे. या पूर्व विदर्भात तात्काळ १८ कोटी रुपयांची मदत पाठवली आहे. विदर्भाला पूर्णपणे मदत करणार, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या -

उत्तर कोरियाच्या अर्थव्यवस्थेवर उपस्थित केले प्रश्न, किम जोंग भडकला; 5 अधिकाऱ्यांना गोळी घालण्याचा दिला आदेश

CNG, PNG डिस्ट्रिब्यूटर होण्याची संधी, मोदी सरकार देणार लायसन्स

कोरोना व्हायरस : "जब तक दवाई नहीं, तब तक ढिलाई नहीं"; पंतप्रधान मोदींनी दिला सावधगिरीचा इशारा

मोदी सरकार आणतंय नवी पॉलिसी, भंगारमध्ये जाणार तुमची जुनी गाडी

कमावण्याची संधी : 'या' IPOमध्ये पैसे गुंतवण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, फक्त 3 तासांतच सुपरहिट!

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्रcorona virusकोरोना वायरस बातम्या