शहरं
Join us  
Trending Stories
1
खोटा प्रचार केल्याने वास्तव बदलणार नाही; अरुणाचल प्रदेशावर दावा करणाऱ्या चीनला भारताचे प्रत्युत्तर
2
बुरहान वानीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी दिल्ली बॉम्बस्फोट घडवला? डॉ. उमर बद्दल मोठा खुलासा...
3
T20 World Cup 2026 Schedule Announced : टी-२० वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर! भारत-पाक एकाच गटात
4
खडसे-महाजन वादात माझा सँडविच होतोय; केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंचे मोठे विधान
5
सुप्रीम कोर्टाच्या सुनावणीवर CM फडणवीसांचे भाष्य; म्हणाले, “निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया...”
6
Video: धक्कादायक! माजी आमदार निर्मला गावित यांना अज्ञात कारने उडवले, रुग्णालयात दाखल
7
कुटुंबियांचा लग्नास विरोध; पाकिस्तानी हिंदू प्रेमी युगुल सीमा ओलांडून भारतात, BSF ने घेतले ताब्यात
8
“जोपर्यंत CM आहे, तोपर्यंत लाडकी बहीण योजना बंद होऊ देणार नाही”; फडणवीसांनी दिला शब्द
9
बिहार फत्ते; आता 'या' दोन राज्यात NDA चे सरकार स्थापन होणार, अमित शाहांचा मोठा दावा...
10
आम्ही जाण्यापूर्वीच पोस्टमार्टेम, पंचनामा नाही, तिच्या डोक्यावर वळ...; गौरी गर्जे-पालवेच्या आईचे गंभीर आरोप 
11
TET Paper Leak: मराठवाड्यातून गोंदियातील शिक्षकांना कॉल, कुणाकडे दीड लाख, कुणाला मागितले तीन लाख रुपये
12
'सहकुटुंब सहपरिवार' फेम अभिनेत्री अडकली लग्नबेडीत, पुण्यात थाटामाटात पार पडला विवाहसोहळा
13
चीनने पुन्हा गरळ ओकली; अरुणाचल प्रदेश चीनचा भाग असल्याचा पुनरुच्चार...
14
Travel : परदेशात कशाला... भारतातच आहे 'मिनी थायलंड'; कपल्ससाठी 'स्वर्गीय' ठिकाण!
15
तुम्हीही बेडवर लॅपटॉप चालवताय? एक मोठी चूक आणि बसू शकतो हजारोंचा फटका! ताबडतोब वाचा...
16
'...तर देशभरात भाजपचा पाया हादरवून टाकेन', SIR प्रक्रियेवरुन ममता बॅनर्जींचा केंद्रावर हल्लाबोल
17
भेटायला म्हणून गेला अन् भलताच अडकला! गावकऱ्यांनी २ मुलांच्या आईसोबत लावून दिलं तरुणाचं लग्न अन्... 
18
राम मंदिरावर धर्मध्वज डौलानं फडकला, ध्वजावरील ‘ते’ झाड नेमकं कोणतं? इंटरेस्टिंग माहिती...
19
थोडी सभ्यता बाळगा! विमानतळावर पायजमा-स्लिपर घालून येऊ नका! अमेरिकेत निघाला ट्रम्प सरकारचा फतवा
20
"जे होतं ते आम्ही फडणवीस यांच्यासमोर मनमोकळ्या...", महायुतीतील नाराजी नाट्यावर एकनाथ शिंदेंचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

"मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा"; CM फडणवीसांच्या टीकेला उद्धव ठाकरेंचे प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2025 15:29 IST

छत्रपती संभाजीनगर येथील मोर्चावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिले.

Uddhav Thackeray On CM Devendra Fadnavis: अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळवून देण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून छत्रपती संभाजी नगरमध्ये हंबरडा मोर्चा काढण्यात आला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात १ लाख रुपये दिवाळीआधीच जमा करा असं आव्हान दिलं. यावेळी उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांनी कशात पाहायचं हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे म्हटलं. तसेच पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरुनही उद्धव ठाकरेंनी भाष्य केलं.

ठाकरे गटाच्या हंबरडा मोर्चावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी टीका केली होती. उद्धव ठाकरे यांनी एकदा स्वतःला आरशात बघितलं, तर अशा प्रकारचे मोर्चे काढणार नाहीत. मी यापूर्वीही सांगितलं ठाकरेंनी त्यांच्या सरकारच्या काळात वीस हजार कोटी रुपयांची कर्जमाफी करण्याची घोषणा केली. मात्र, त्यांनी फुटकी कवडी देखील शेतकऱ्यांना दिली नाही. ठाकरेंच्या आधी आम्ही सत्तेत असताना देखील २० हजार कोटींची कर्जमाफी केली होती. त्यामुळे त्यांनी काही फार मोठे काम केलं असे नाही. उलट त्यांनी घोषणा केली होती, चालू खात्यावर आम्ही ५० हजार रुपये देऊ, मात्र, त्यांनी काहीही दिले नाही. उलट १६ लाख शेतकऱ्यांना महायुतीचे सरकार आल्यावर अनुदान दिले, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं होतं.

मुख्यमंत्र्यांनी केलेल्या टीकेला उद्धव ठाकरे यांनी मोर्चानंतर प्रत्युत्तर दिले. "मी आरशात बघतो, पण तुम्ही शेतकऱ्यांकडे तरी बघा. तुम्हीच सांगताय की आतापर्यंत कधी आलेले नाही असं हे भीषण संकट आहे. मुख्यमंत्री असताना नागपूरला जे अधिवेशन झाले होते तेव्हा असे संकट नव्हते. तरीसुद्धा मी कर्तव्य म्हणून शेतकऱ्यांना दोन लाखांपर्यंत पीक कर्जमुक्ती केली होती. जो शेतकरी नियमित कर्जफेड करतो त्यांसाठी ५० हजारांची राशी जाहीर केली होती. त्यांनी २०१७ साली केलेली कर्जमुक्ती अजूनही चालू आहे," असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं.

"शेतकऱ्यांची अपेक्षा आहे की त्यांना ५० हजार हेक्टरी मिळावेत. गेल्या हंगामाचे कर्ज त्यांच्या डोक्यावर आहे. हे पीक हाती लागलं असतं तर शेतकऱ्यांना थोडे पैसे मिळून कर्जाची थोडीफार परतफेड झाली असती. आता जमीन पूर्ववत करुन देण्याची गरज आहे आणि कर्जमाफीची गरज आहे. कारण ते आता कर्ज फेडूच शकत नाहीत. त्यामुळे सरकारने जबाबदारी घेतली पाहिजे. पंतप्रधान मुंबईत येऊन गेले पण त्यांनी शेतकऱ्यांबद्दल एक शब्दही काढला नाही. जिथे तुम्ही जाताय तिथे शेतकरी सुद्धा आहे याची कल्पना त्यांना दिली होती की नाही हे माहिती नाही. पंतप्रधान मोदींचा दौरा सुरळीत व्हावा म्हणून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्यासाठी हे  पॅकेज जाहीर केले," असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Uddhav Thackeray Counters CM Fadnavis' Criticism, Focuses on Farmers' Plight

Web Summary : Uddhav Thackeray criticized the government for neglecting rain-affected farmers during his rally. He demanded immediate financial aid and loan waivers, countering CM Fadnavis' remarks. Thackeray highlighted his past efforts for farmers and questioned PM Modi's silence on the issue during his visit.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस