शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे
2
अमित शाह यांनी '102 डिग्री' ताप असतानाही संसदेत 'मत चोरी'वर दिलं उत्तर, सभागृह सोडून गेले राहुल गांधी
3
“प्राचीन मंदिर पाडून RSSचे कार्यालय”; उद्धव ठाकरेंची अमित शाहांवर टीका, ‘तो’ फोटोही दाखवला
4
अण्णा हजारे पुन्हा उपोषणाला बसणार, सशक्त लोकायुक्तावरून राज्य सरकारला दिला असा इशारा...  
5
"बिबट्यांना पाळीव प्राण्यांचा दर्जा द्या", आमदार रवी राणा यांची अजब मागणी 
6
उंदीर मारण्याचं औषध, सल्फास, तुटलेला मोबाईल...; नवरदेवाचा संशयास्पद मृत्यू, आज होतं लग्न
7
टाटा-महिंद्रासह 'या' शेअर्समध्ये जोरदार तेजी! सलग ३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; फक्त एका क्षेत्रात तोटा
8
लेकीचं भविष्य 'सेफ' करण्यासाठी करा 'या' ६ ठिकाणी गुंतवणूक! मिळवा सर्वाधिक परतावा आणि टॅक्समध्ये सूट
9
फ्रान्समध्ये अचानक वीज झाली 'मोफत', सरकारकडून नागरिकांना 'शून्य दरात' पुरवठा
10
पंतप्रधान मोदींचे उत्तराधिकारी देवेंद्र फडणवीस होणार?; CM म्हणाले, “बाप जिवंत असताना...”
11
इंडिगोचा मोठा निर्णय! त्रस्त प्रवाशांना नुकसानभरपाई; मिळणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर
12
Electric Geyser Safety Tips: तुम्ही Geyser वापरता? मग 'या' ३ गोष्टींची काळजी घ्या, अपघात टळेल!
13
Tanya Mittal : "कृपया, माझे पैसे द्या...", तान्या मित्तलने ८०० साड्यांचं पेमेंट बुडवलं? स्टायलिस्टचा गंभीर आरोप
14
TATA च्या 'या' शेअरची बिकट स्थिती; ५०% पेक्षा जास्त घसरला, नव्या नीचांकी स्तरावर पोहोचला शेअर
15
पाकिस्तानी इतिहासात पहिल्यांदाच ISI प्रमुखाला शिक्षा! इम्रान खानशी संबंध भोवले, जनरल फैज हमीद १४ वर्षे तुरुंगवास
16
'अमित शाह घाबरले, त्यांचे हातही थरथरत होते...', राहुल गांधींचा गृहमंत्र्यांवर निशाणा
17
डेट फंड्सकडे गुंतवणूकदारांची पाठ! महिन्यात २५,६९२ कोटी काढले, 'या' योजनेला सर्वाधिक पसंती
18
करण जोहरची 'धुरंधर'वर प्रतिक्रिया, रणवीर सिंह अन् दिग्दर्शक आदित्य धरबद्दल म्हणाला...
19
Arunachal Pradesh Accident: अरुणाचल प्रदेशात मजुरांना घेऊन जाणारा ट्रक खोल दरीत कोसळला, १७ जणांचा मृत्यू झाल्याची भीती
20
IPO पूर्वी झुनझुनवाला कुटुंबानं 'या' कंपनीत केली ₹१०० कोटींची गुंतवणूक, अन्य २५ दिग्गजांनीचीही इनव्हेस्टमेंट
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांनी 'पांघरूण खातं' सुरु करावं आणि त्याचं मंत्री व्हावं- उद्धव ठाकरे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2025 16:14 IST

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis: या सरकारचं लोकांकडे लक्षच नाही, केवळ प्रचारांमध्ये व्यस्त आहे

Uddhav Thackeray vs Devendra Fadnavis: महायुतीतील मंत्र्यांचे रोज नवनवीन घोटाळे उघड होत आहेत आणि मुख्यमंत्री त्यांच्यावर कारवाई करत नाहीत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी पांघरूण खाते तयार करावे, असा सणसणीत टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला. नागपूरला विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात पोहचल्यानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

"महायुतीतील नेतेमंडळींचा कुणालाही कसलाही पायपोस राहिलेला नाही. मित्र-मित्र म्हणून एकमेकांवर धाडी टाकल्या जात आहेत. एकमेकांची भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस आणली जात आहेत. रोज कुठल्या ना कुठल्या मंत्र्याचे भ्रष्टाचार पुराव्यानिशी दिसत आहेत. काही व्हिडिओ व्हायरल होत आहे. तरीसुद्धा मुख्यमंत्री ढिम्म आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता एक खाते निर्माण केले पाहिजे आणि एक पांघरूण मंत्री ठेवायला पाहिजे. म्हणजे किमान इतर बाकीचे मंत्री पांघरूण बघून हात पाय पसरतील. कारण मुख्यमंत्री त्यांच्या चुकांवर पांघरूण घालायलाच बसले आहेत. इतर खात्यांच्या सोबतच मुख्यमंत्र्यांनी पांघरूण खातेही सुरू करावे आणि स्वतः त्याचा चार्ज घ्यावा," असा टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला.

"आम्ही विरोधी पक्ष पदासाठी भास्कर जाधव यांचे नाव दिलेले आहे. आम्ही आधीच दावा सांगितलेला आहे. पण अद्याप आम्हाला उत्तर मिळालेले नाही. सरकार आम्हाला विरोधी पक्षनेतेपद देण्यासाठी घाबरत आहे का? हा प्रश्न आहे. सरकार मजबूत आहे तर तुम्ही कुणाला घाबरत आहात? तुमच्या २०० हून जास्त जागा निवडून आल्या आहेत. केंद्र सरकारचा तुमच्याकडे मोठा आशीर्वाद आहे. तरीही तुम्ही विरोधी पक्षनेते पदाला का घाबरत आहात? जर विरोधी पक्ष नेतेपदासाठी नियम लावणार असाल, तर उपमुख्यमंत्रीपद देखील संवैधानिक आहे. तेही रद्द करा," अशी मागणी त्यांनी केली.

"विरोधी पक्ष नेते निवडण्याचा अधिकार अध्यक्षांना आहे की मुख्यमंत्र्यांना ही लोकशाहीची मांडणी आहे. या गोष्टी उगाचंच फिरवून ठेवल्या जात आहेत. अध्यक्षांबाबतची आमची मतं आम्ही गेल्या टर्ममध्ये व्यक्त केलेली आहेत. मुख्यमंत्र्यांनी याचा जाब विचारला पाहिजे. सरकारचे लोकांकडे लक्षच नाही. हे सरकार प्रचारांमध्ये व्यस्त आहे. एक निवडणूक संपली की दुसऱ्या निवडणुकीची आचारसंहिता सुरू होईल. असाच हा खेळ सुरू ठेवला जाईल," अशी शंका उद्धव यांनी व्यक्त केली.

English
हिंदी सारांश
Web Title : Start 'Cover-Up Ministry,' become minister: Uddhav slams Fadnavis.

Web Summary : Uddhav Thackeray criticized CM Shinde, alleging inaction on ministers' corruption. He suggested creating a 'Cover-Up Ministry' led by Fadnavis. Thackeray questioned delaying opposition leader selection, demanding Deputy CM post scrutiny, accusing the government of neglecting governance for elections.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtraमहाराष्ट्रnagpurनागपूरWinter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन