शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंनी 'लावला तो ऑडिओ'; देवेंद्र फडणवीसांना दिलं ओपन चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 17:57 IST

व्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी वीजबिलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी विरोधात असताना जे विधान केले ते मोबाईलवरून ऐकवले.

बुलढाणा - मी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवलं होतं. केवळ घोषणा केली नव्हती. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती झाली की नाही असं विचारलं होतं. तेव्हा शेतकऱ्याने होय कबुली दिली होती. माझं उघड आव्हान आहे. जेव्हापासून खोके सरकार महाराष्ट्राच्या गादीवर बसलं तेव्हापासून पनवती सुरू झालीय. हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. वीजबिल माफ केलं नाही असं सांगत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिंदे-फडणवीस सरकारवर घणाघात केला आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, ओला दुष्काळ आला तरी कृषी मंत्री म्हणतात ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज काय? जो शेतकरी राबतोय तो आज विचारतोय मी खायचं काय? शिव्या खावून तुमचं पोट भरत असेल पण माझ्या शेतकऱ्यांचे पोट कसे भरणार ते सांगा. पीक विमा कंपन्यांची मस्ती पुन्हा उतरवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला. 

देवेंद्र फडणवीसांना ओपन चॅलेंजव्यासपीठावरून उद्धव ठाकरेंनी वीजबिलाबाबत देवेंद्र फडणवीसांनी विरोधात असताना जे विधान केले ते मोबाईलवरून ऐकवले. देवेंद्रजी जनाची नाही तर मनाची लाज बाळगा, वीजबिल माफ करा हे माझं आव्हान आहे. जी कर्जमुक्ती आम्ही केली तिचा लाभ शेतकऱ्यांना मिळाला. पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांची कर्जमुक्ती राहिली होती. तेव्हा सरकारने बँकेला गॅरंटी देऊन माफ करायला लावली होती. मात्र तोपर्यंत या रेड्यांनी शेण खाल्ले. कुणाचं नुकसान झाले? अतिवृष्टीचे पैसे कुणाला मिळाले त्यांनी हात दाखवावं. राज्य खोटं बोलून चाललं आहे. काही वाटेल ते चालले आहे. ही जनता भोळीभाबडी राहिली नाही असं उद्धव ठाकरे म्हणाले. 

भाजपा नव्हे तर भाकड पक्षविचार संपले, नेते संपले भाकड पक्ष झाला आहे. बाहेरच्या पक्षातून आयात केलेले नेते किती याची यादी करा. मनावर दगड ठेऊन आम्ही मुख्यमंत्री बसवलाय असं चंद्रकांत पाटील म्हणाले. हा आयात पक्ष आहे. त्यांची दादागिरी तुम्ही सगळे मर्दमावळे मोडून टाकणार नाही? हा चोर पक्ष आहे. मी ४० रेड्यांना, गद्दारांना विचारतोय. आम्ही भाजपाच्या तिकीटावर निवडणूक लढणार नाही हे जाहीर सांगावं. यांना केवळ नाव बाळासाहेबांचं, चेहरा बाळासाहेबांचा आणि आशीर्वाद मोदींचा तुमची मेहनत कुठे आहे? असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा