शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊतांचा एकनाथ शिंदेंवर हल्लाबोल; "मुख्यमंत्रिपदावर आहात म्हणून नाहीतर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2023 13:35 IST

ज्यादिवाशी तुम्ही मुख्यमंत्री पदावर नसाल तेव्हा तुमचा बार वरून उडेल की खालून उडेल ते बघा, फक्त ३१ डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद जाऊद्या मग कळेल असं संजय राऊत म्हणाले.

मुंबई -  एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आहेत नाहीतर त्यांची औकात काय आहे? शिंदे हे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत. त्यांना बसवलं गेलंय. शिवसेनेला फोडा, संपवा हे भाजपाचं जुनं स्वप्न आहे. त्यांनी बरेच प्रयत्न केले परंतु यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर ईडी, सीबीआयच्या माध्यमातून आमचे काही माणसं फोडून नवीन सरकार बनवलं. आता आमच्यात लोकांना एकमेकांसमोर उभं करून मराठी माणसांमध्ये फूट पाडण्याचं काम भाजपा करतंय असा आरोप संजय राऊत यांनी करत भाजपा आणि एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.  

संजय राऊत म्हणाले की, एकनाथ शिंदेंची काही ताकद नाही. शिंदेंसोबत ४० लोक गेलेत, ते शिवसेना नाही. खरी शिवसेना काय हे मुंब्र्यात दिसलं, उद्धव ठाकरे जेव्हा तिथे गेले तेव्हा संपूर्ण मुंब्रा, ठाणे रस्त्यावर आले ती खरी शिवसेना आहे. जर तुम्ही मुख्यमंत्री नसता, पोलिसांचा वापर केला नसता किंवा दिवाळी नसती तर त्या शाखेचा ताबा आमच्याकडे असता. परंतु दिवाळीत वातावरण बिघडू नये असं आम्हाला वाटलं, उद्या हेच पोलीस आमचे आदेश मानतील तेव्हा काय कराल? एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेले लोक ही शिवसेना नाही तर गँग आहे, चोरांची टोळी आहे असा हल्लाबोल त्यांनी केला.

तसेच, ज्यादिवाशी तुम्ही मुख्यमंत्री पदावर नसाल तेव्हा तुमचा बार वरून उडेल की खालून उडेल ते बघा, फक्त ३१ डिसेंबरनंतर मुख्यमंत्रिपद जाऊद्या मग कळेल, भाजपाने तुमचा बार उडवला आहे. ३१ डिसेंबरनंतर बोलावे. भाजपाच्या गुलामांनी, दिल्लीतल्या चरणदासाने मराठी माणसांची, महाराष्ट्राची बेअब्रू केलीय त्यांनी शिवसेनेला ज्ञान पाजळू नये. मुंब्रा इथं गेलो, हजारो शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते, पोलिसांनी आम्हाला थांबवण्याचा प्रयत्न केला. तुमच्याकडे सत्ता आणि पोलीस नसते तर चित्र वेगळे दिसले असते. दिवाळी आहे आम्ही संयम पाळला त्यासाठी उपकार मानले पाहिजे असं टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

दरम्यान, आम्ही कायदेशीर लढाई करतोय, दोन जण भांडणे करतील आणि तिथे जाऊन आपण आपले काम करू ही भाजपाची नीती आहे. फोडा आणि राज्य करा हा भाजपाचा विचार आहे. राष्ट्रवादाचा विचार नाही. जातधर्माच्या आधारे देश आणि राज्ये फोडायची आणि सरकार चालवायचा हे भाजपाचे काम आहे. भाजपा काय आहे? त्यांच्याकडे काय विचार आहे? एकनाथ शिंदे, अजित पवार हे भाजपा विचाराचे प्रचारक आहेत? सत्ता आणि पैसा, आपापल्या उद्योगपतींना धनाढ्य बनवणे आणि लोकांना गरीब बनवणे हा भाजपाचा विचार आहे असा आरोप संजय राऊतांनी केला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा