मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट अन् वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा! 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 01:54 PM2021-06-17T13:54:37+5:302021-06-17T13:55:36+5:30

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभीष्टचिंतन केले.

Uddhav Thackeray meets Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan and wished him a happy birthday! | मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट अन् वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा! 

मुख्यमंत्र्यांनी घेतली राज्यपालांची भेट अन् वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा! 

Next

मुंबई : राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा दीड वर्ष संघर्ष असला तरी महाराष्ट्राची राजकीय संस्कृतीचा वारसा जपत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राजभवनावर पोहोचले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सकाळी राजभवन येथे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची वाढदिवसानिमित्त सदिच्छा भेट घेतली आणि त्यांचे अभीष्टचिंतन केले. यावेळी त्यांच्यासमवेत मुख्य सचिव सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, शिवसेना पक्ष सचिव मिलिंद नार्वेकर उपस्थित होते.

दरम्यान, गेल्या आठ महिन्यांपासून विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांचा मुद्या प्रलंबित असल्यामुळे राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात संघर्ष सुरु आहे. यातच, विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त सदस्यांसाठी राज्य मंत्रिमंडळाने पाठविलेली यादी ही राज्यपाल महोदयांकडेच असल्याचे स्पष्ट झाले आहे. 

राजभवनाकडे ही यादीच उपलब्ध नसल्याचे वृत्त मध्यंतरी एका माहिती अधिकाराच्या अनुषंगाने देण्यात आले होते.पण, ही यादी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्याकडेच असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यपालांकडेच बारा जणांच्या नावांची यादी !
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळाने विधान परिषदेवरील राज्यपाल नियुक्त १२ सदस्यांची  नावे पारित करुन राज्यपालाकडे मंजुरीसाठी पाठविली होती ती यादी उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना दिली होती. त्यानंतर मंगळवारी १५ जून रोजी राजभवन सचिवालयात याबाबत अनिल गलगली यांनी दिलेल्या आव्हान अपिलावर झालेल्या सुनावणीत ती यादी राज्यपालाने स्वतःकडे ठेवली असल्याचे सांगण्यात आले. 

आता राज्यपालांनी निर्णय घेतल्यावरच माहिती मिळेल असे सांगण्यात आले आहे. अनिल गलगली यांनी संभ्रमित करणाऱ्या माहिती बाबत प्रथम अपील दाखल केले असून  मंगळवारी १५ जून रोजी राज्यपालांच्या उप सचिव असलेल्या प्राची जांभेकर यांनी सुनावणी घेतली. ‘राज्यपालांकडे यादीसह संपूर्ण नस्ती आहे. निर्णय झाल्यावर माहिती देण्यात येईल. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने माहिती द्यावी किंवा नाही? याबाबत सल्लामसलत केली जाईल, असे जांभेकर यांनी स्पष्ट केले.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Uddhav Thackeray meets Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan and wished him a happy birthday!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app