शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

Uddhav Thackeray Live: … तर मी शिवसेना पक्षप्रमुखपद सोडायलाही तयार, उद्धव ठाकरे भावूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 18:14 IST

काँग्रेस-राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री हवा होतो. पण माझ्या लोकांनाच मी नको - उद्धव ठाकरे

काँग्रेस-राष्ट्रवादीला मी मुख्यमंत्री हवा होतो. पण माझ्या लोकांनाच मी नको. सूरतला जाऊन बोलण्यापेक्षा इथे माझ्याशी चर्चा करायला हवी होती. एकाही आमदाराने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री नको असं म्हटलं तर आज संध्याकाळी मी वर्षाहून मातोश्रीला मुक्काम हलवतो. उगाच का असं करताय? मी राजीनामा तयार करून ठेवला. या आणि राजभवनात पत्र घेऊन जा, सत्तेसाठी मी लाचार नाही असं भावनिक आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बंडखोर आमदारांना केले. 

कोणताही मला मोह नाही, मी शिवसेनाप्रमुखांचा मुलगा आहे. मोह मला खेचू शकत नाही. जे काही आहे ते समोर येऊन बोला. समोर बसा मी राजीनामा देतो. मी राजीनाम्याचं पत्र तयार करून ठेवतो. माझं राजीनाम्याचं पत्र घेऊन जावं. हा आगतिक पणा, लाचारी, मजबूरी नाही. जोपर्यंत माझ्यासोबत शिवसेना प्रमुखांनी जोडलेला शिवसैनिक आहे तोवर मी भीत नाही, असंही उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.

ज्या शिवसैनिकांना वाटत असेल मी शिवसेनेचं नेतृत्व करायला नालायक आहे, मी शिवसेनेचं पक्षप्रमुख पद सोडायलाही तयार आहे. पण हे सांगणारा विरोधक नाही, मी माझ्या शिवसैनिकांना बांधील आहे. त्यांनी सांगावं, मी दोन्ही पदं सोडायला तयार आहे. मी मुख्यमंत्रीपद सोडल्यावर शिवसेनेचा मुख्यमंत्री होत असेल तर आनंदानं मान्य असल्याचंही त्यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदेंना चपराक“अनेकजण म्हणत आहेत की, शिवसेना बाळासाहेबांच्या विचारापासून दूर गेली आहे. पण, २०१२ मध्ये बाळासाहेब गेले, त्यानंतर २०१४ मध्ये सेना एकटी लढली. त्यानंतर आताही लढत आहोत. तेव्हाही शिवसेना बाळासाहेबांची होती, आताही आहे. माझ्यासोबत आता जे सहकारी आहेत, ते बाळासाहेबांच्या सोबतचेच आहेत. मधल्या काळात त्यांना जे काही मिळालं, ते बाळासाहेबांच्या शिवसेनेनंच दिलं,” असंही ठाकरे म्हणाले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्रShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे