पक्षबांधणी मोहीमेसाठी उद्धव ठाकरे लोणावळ्यात

By Admin | Updated: May 6, 2017 12:39 IST2017-05-06T12:39:15+5:302017-05-06T12:39:15+5:30

शिवसेना संघटना बांधणीसाठी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम सुरू करण्यात आली आहे.

Uddhav Thackeray for Liberal campaign in Lonavala | पक्षबांधणी मोहीमेसाठी उद्धव ठाकरे लोणावळ्यात

पक्षबांधणी मोहीमेसाठी उद्धव ठाकरे लोणावळ्यात

ऑनलाइन लोकमत 

लोणावळा, दि. 6 - शिवसेना संघटना बांधणीसाठी शिवसेनेच्या वतीने महाराष्ट्रभर शिवसंपर्क मोहीम सुरू करण्यात आली आहे. यामध्ये केवळ पक्षाच्या पदाधिकार्‍यांना भेटून पक्ष बांधणी करण्यात येणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
 
शिवसंपर्क मोहीमेचा शुभारंभ शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कार्ला गडावरील कुलस्वामींनी एकविरा देवीचे दर्शन घेऊन केला.  यावेळी त्यांच्या समवेत पत्नी रश्मी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, श्री एकविरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष माजी आमदार अनंत तरे, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, मुंबई व ठाण्याचे महापौर, उपमहापौर व नगरसेवक तसेच मावळातील पदाधिकारी उपस्थित होते.
 
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,  जवळपास चार वर्षानंतर ही शिवसंपर्क मोहीम घेण्यात आली आहे. यामध्ये पक्ष बांधणीसाठी पदाधिकार्‍यांच्या भेटी घेण्यात येणार आहे. मी स्वतः रविवारी (7 मे) मराठवाड्याच्या दौर्‍यावर जाणार आहे. काही जणांमध्ये हा गैरसमज आहे की ही मोहीम शेतकर्‍यांना भेटण्यासाठी आहे. मात्र मी अद्याप शेतकर्‍यांना भेटण्याचा विचार केलेला नाही. शनिवारी मी कुलस्वामिनीच्या दर्शनासाठी घेतले. तिचे आशीर्वाद महत्त्वाचे आहेत. कामामध्ये यश लाभू दे, असे मागणे एकविरा देवीच्या चरणी मागितले आहे.
 

Web Title: Uddhav Thackeray for Liberal campaign in Lonavala