शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
Top Marathi News LIVE Updates: भोंदू खरात प्रकरणी ईडीची मोठी कारवाई; ११ ठिकाणी टाकली धाड, मालमत्तेची चौकशी
4
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
5
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
7
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
8
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
9
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
10
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
11
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
12
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
13
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
14
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
15
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
16
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
17
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
18
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
19
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
20
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना; मनसे नेते प्रकाश महाजनांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2024 15:33 IST

विशालगडावरील अतिक्रमण आणि राज्यात आरक्षणावरून पेटलेला वाद यावर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाष्य केले आहे. 

नाशिक - उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना आहेत. संजय राऊत यांनी विशालगडाच्या अतिक्रमणावर बोललं पाहिजे असं सांगत मनसे नेते प्रकाश महाजन यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

प्रकाश महाजन बोलले की,  उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवे मोहम्मद अली जिन्ना आहेत. मुस्लीम त्यांच्या आणि ते मुस्लीमांच्या इतके प्रेमात पडले की शंकराचार्यांना घरी आणून त्यांनी पाय धुतले तरी हिंदू त्यांच्याकडे वळतील असं वाटत नाही. संजय राऊतांनी विशालगडाच्या अतिक्रमणावर बोलावं. सकाळचा माईक बंद का करता, त्यावर बोलले पाहिजे असा टोला त्यांनी लगावला. अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंचा उल्लेख औरंगजेब फॅन क्लबचे अध्यक्ष म्हणून केला. त्यावर पत्रकाराने प्रश्न विचारताच महाजनांनी प्रतिक्रिया दिली. टीव्ही ९ च्या मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्यातील अथवा राज्याबाहेरचा कुठलाही किल्ला हा तीर्थक्षेत्र आहे. त्यावर अतिक्रमण होता कामा नये. विशालगडावर जुन्या जागांवर अतिक्रमण झालंय आणि अतिक्रमण करणाऱ्याची बाजू घेणे म्हणजे तुम्ही बेकायदेशीरपणाला पाठिंबा देताय. छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी महाराजांची समाधी कुठे हे कुणाला माहिती आहे का, त्यांची समाधी किती विपन्न अवस्थेत आहे. छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी विशालगडावर सती गेल्यात. काहींना फक्त मतांचे राजकारण करायचे आहे. गजापूर गावात नवीन मुस्लीम वस्ती कुठून उभी राहते, यासिन भटकळ तिथे येऊन राहतो कसा? या गोष्टीचे तुम्ही समर्थन करताय? असा सवालही मनसे नेते प्रकाश महाजनांनी विचारला. 

दरम्यान, महाराष्ट्रात आरक्षणावरून वणवा पेटला आहे तो जर खरेच शरद पवारांना शांत करायचा असेल तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना भेटण्याऐवजी दोन्ही आंदोलकांना सोबत घ्यावे आणि साम्यजंस्याने चर्चा करावी. संवाद करावा, एकमेकांच्या गळ्यावर सुरी ठेवू नका. निष्पाप समाजघटक या आंदोलनात बळी जातोय असं सांगत शरद पवार-एकनाथ शिंदे भेटीवर मनसे नेते प्रकाश महाजन यांनी भाष्य केले. त्याशिवाय माझा पक्ष, माझा नेता जातपात नाहीत. आरक्षण जातीवर नको तर आर्थिक परिस्थितीवर असावं. तरीपण घटनेच्या चौकटीत जे काही बसतंय ते पाहा. मराठा समाजाला आरक्षण द्यायला सगळे पक्ष तयार असतील मग घोडे अडलंय कुठे? आरक्षणाचा वणवा पेटणं हे काही लोकांच्या राजकीय अस्तित्वासाठी सुरू आहे जे सध्या लयाला चालले होते मात्र त्याआधारे लोकसभेत काहींना उभारी मिळाली अशी टीकाही त्यांनी केली.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMNSमनसेMaratha Reservationमराठा आरक्षणSharad Pawarशरद पवार