उद्धव ठाकरे हे अतिशय कर्तव्यदक्ष मुख्यमत्री, आपल्या कर्तव्याचं पालन केलंय - दीपक केसरकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2022 14:00 IST2022-06-27T14:00:05+5:302022-06-27T14:00:19+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला असून बंडखोर आमदारांकडील खात्यांचा कारभार अन्य आमदरांकडे सोपवला आहे.

उद्धव ठाकरे हे अतिशय कर्तव्यदक्ष मुख्यमत्री, आपल्या कर्तव्याचं पालन केलंय - दीपक केसरकर
शिवसेना पक्षप्रमुखउद्धव ठाकरेंना एकामागोमाग एक धक्के बसत असून मंत्री एकनाथ शिंदे गटात सहभागी होणाऱ्या शिवसेना आमदारांची संख्या वाढतच चालली आहे. दिलीप लांडे हे ३८ वे आमदार त्यांच्या गटात गेल्यानंतर मंत्री उदय सामंत हेही गुवाहाटीला रवाना झाले होते. दरम्यान, आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा निर्णय घेतला असून बंडखोर आमदारांकडील खात्यांचा कारभार अन्य आमदरांकडे सोपवण्यात आला आहे. यावर बंडखोर आमदार दीपक केसरकर
“मंत्र्यांची खाती काढली ही अतिशय चांगली गोष्ट आहे. मुख्यमंत्री असतात त्यांनी राज्याची काळजी घेतली पाहिजे. उद्धव ठाकरे हे अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री आहेत. आपले काही सहकारी बाहेर गेले असतील तर त्यांची खाती इतरांकडे देऊन राज्याचा कारभार सुरळीत चालवणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्यांनी आपल्या कर्तव्याचं पालन केलं, याचं मी स्वागत करतो,” असं दीपक केसरकर म्हणाले. एबीपी माझाला दिलेल्या प्रतिक्रियेत त्यांनी यावर भाष्य केलं.
खात्यांचा कारभार इतरांकडे
जनहिताची कामे अडकून न राहता ती अविरतपणे सुरू राहण्यासाठी तसेच सध्या सुरू असलेल्या पावसाळ्यात अतिवृष्टी, आपत्तीच्या घटना अशा परिस्थितीत विभागांची कामे सुरळीतपणे पार पाडण्यासाठी अनुपस्थित पाच मंत्री आणि चार राज्यमंत्री यांच्याकडील खाती इतर मंत्र्यांना सोपविण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे.
- एकनाथ शिंदे यांच्याकडील नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) खाती सुभाष देसाई यांच्याकडे सोपविण्यात आलं आहे.
- गुलाबराव रघुनाथ पाटील यांच्याकडील पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग हे खाते अनिल दत्तात्रय परब यांच्याकडे देण्यात आलं आहे.
- दादा भुसे यांच्याकडील कृषि व माजी सैनिक कल्याण खाते तसेच संदिपान भुमरे यांच्याकडील (रोजगार हमी, फलोत्पादन खाते शंकर यशवंतराव गडाख यांच्याकडे सोपविण्यात आलं आहे.
- उदय सामंत यांच्याकडील उच्च व तंत्र शिक्षण खाते आदित्य ठाकरे यांच्याकडे देण्यात आले आहे.
- शंभूराज शिवाजीराव देसाई यांच्याकडील खाती आता संजय बाबुराव बनसोडे राज्यमंत्री (गृह ग्रामीण), विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता, पणन, सतेज उर्फ बंटी डी. पाटील, (रा.उ.शु.) यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
- राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर राज्यमंत्री यांच्याकडील खाती विश्वजित पतंगराव कदम, राज्यमंत्री (सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण), प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (वैद्यकीय शिक्षण, वस्त्रोद्योग),सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (अन्न व औषध प्रशासन),आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (सांस्कृतिक कार्य) यांच्याकडे सोपविण्यात आली आहेत.
- अब्दुल नबी सत्तार, राज्यमंत्री यांच्याकडील खाती प्राजक्त प्रसाद तनपुरे, राज्यमंत्री (महसूल), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (ग्राम विकास), आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्य) यांच्याकडे.
- ओमप्रकाश उर्फ बच्चू बाबाराव कडू राज्यमंत्री यांच्याकडील खाती आमदार आदिती सुनिल तटकरे, राज्यमंत्री (शालेय शिक्षण), सतेज उर्फ बंटी डी. पाटील, राज्यमंत्री (जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, कामगार), संजय बाबुराव बनसोडे, राज्यमंत्री (महिला व बाल विकास), दत्तात्रय विठोबा भरणे, राज्यमंत्री (इतर मागास बहुजन कल्याण)