शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

भाजपानंही शत्रू न वाढवता आता...; उद्धव ठाकरेंनी पुढे केला मैत्रीचा हात?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2022 09:40 IST

मुख्यमंत्रिपद मला आव्हान म्हणून स्वीकारावे लागले. सर्व गोष्टी ठरवल्यानंतर भाजपाकडून त्या नाकारण्यात आल्या म्हणून मला ते करावं लागलं असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मुंबई - आपल्या देशात सध्या लोकशाही संपून हुकुमशाही आली असे मी म्हणणार नाही. परंतु ज्या दिशेने पावलं पडताहेत ती पाहता ही लक्षणं काही बरी नाही असं अनेकांचं म्हणणं आहे. देशातील सर्व राज्यांनी एकत्र यायला हवं. एकदा लढा उभा राहिला की देश जागा होईल. भाजपानेसुद्धा अधिक शत्रू न वाढवता ज्याला आपण आरोग्यदायी राजकारण म्हणतो असं हेल्दी पॉलिटिक्स करावं असं विधान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सामनाच्या मुलाखतीतून केले आहे. 

मुलाखतीच्या दुसऱ्या भागात उद्धव ठाकरे म्हणाले की, भाजपा आणि आम्ही मित्रच होतो. २५-३० वर्षे आम्ही सोबतच होतो. तरीसुद्धा २०१४ ला युती तोडली. कारण काहीही नव्हतं. तेव्हा आपण हिंदुत्व सोडलेले नव्हतं आणि आजही सोडलेले नाही. तेव्हासुद्धा भाजपाने शेवटच्या क्षणाला शिवसेनेशी युती तोडली होती. त्यावेळी तर आम्ही मित्रच होतो. २०१९ ला काय मागत होतो? मी अडीच वर्षासाठी शिवसेनेकरिता मुख्यमंत्रिपद मागत होतो आणि द्यायचं ठरलं होतं. ते मुख्यमंत्रिपद माझ्यासाठी नव्हतं. मी हे का मागितले? कारण सरत्या काळामध्ये शिवसेनाप्रमुखांना वचन दिले होते की शिवसेनेचा मुख्यमंत्री करून दाखवेन असं त्यांनी म्हटलं. 

त्याचसोबत माझं ते वचन अजूनही अर्धवटच आहे असे म्हणाले लागेल. कारण मी मुख्यमंत्री बनेन असं म्हणालो नव्हतो. मुख्यमंत्रिपद मला आव्हान म्हणून स्वीकारावे लागले. सर्व गोष्टी ठरवल्यानंतर भाजपाकडून त्या नाकारण्यात आल्या म्हणून मला ते करावं लागलं असं बरं झालो मुख्यमंत्री, कारण मी आता होऊन गेलेलो आहे काय प्रॉब्लेम तुम्हाला? तुम्ही ज्या बाळासाहेबांचा फोटो लावता त्या बाळासाहेबांच्या पुत्राला गादीवरून खाली उतरवले असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. 

भाजपाचे जुनेजाणते नेते आजही संपर्कातदेवेंद्र फडणवीसांसोबत भाजपा असे का वागले समजत नाही. तो त्यांच्या पक्षांतर्गत विष. आहे. त्यांच्या पक्षातील जुनेजाणते निष्ठावान त्यावेळी आमच्या बरोबर युतीत असणारे अनेक नेते आजही माझ्या संपर्कात आहेत. पण ते निष्ठेने भाजपासोबत आहेत. त्यांच्याबद्दल मला गैरसमज करू द्यायचा नाही. त्यांना शिवसेनेसोबत यायचं आहे. मी उगाच पोकळ दावा करणार नाही. मात्र त्यांना सध्याच्या गोष्टी पटत नाहीत. पण तरीदेखील ते निष्ठेने भाजपाचे काम करताहेत. बाहेरच्यांना सर्व दिलं जातंय त्यांच्या डोक्यावरती बाहेरची माणसं बसवली. विधान परिषदेत तेव्हाचे विरोधी पक्षनेते, आता मुख्यमंत्री इतर पदांवरही बाहेरचे तरीही ते निष्ठा म्हणून काम करत आहेत असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी सांगितले.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा