शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
4
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
5
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
8
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
9
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
10
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
11
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
12
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
13
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
14
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
15
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
16
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
17
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
18
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
19
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
20
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर

मी बघितलेले उध्दव ठाकरे हे नव्हेत, हे विश्वासघातकी सरकार : देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2019 14:38 IST

मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा वडिलांना शब्द दिला होता असे म्हणणाऱ्या ठाकरे यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता का अशी विचारणा करत मी बघितलेले उध्दव ठाकरे हे नव्हेत असा टोला फडणवीस यांनी लगावला.

ठळक मुद्देमी बघितलेले उध्दव ठाकरे हे नव्हेत : देवेंद्र फडणवीसविश्वासघातकी सरकारकडून शेतकऱ्यांचा विश्वासघात

कोल्हापूर : मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचा वडिलांना शब्द दिला होता असे म्हणणाऱ्या ठाकरे यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादीच्या जीवावर मुख्यमंत्री करण्याचा शब्द दिला होता का अशी विचारणा करत मी बघितलेले उध्दव ठाकरे हे नव्हेत असा टोला फडणवीस यांनी लगावला.

एका विवाह समारंभाच्यानिमित्ताने रविवारी फडणवीस कोल्हापुरात आले होते. त्यांनी सोमवारी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. विश्वासघाती सरकारने कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे. अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा एक पै चाही फायदा नाही अशी टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.ते म्हणाले,आज शेतकरी अडचणीत आहे. त्याला तातडीने मदत देण्याची गरज होती. सरसकट कर्जमाफी आणि सात बारा कोरा करतो अशी घोषणा करणाऱ्यांनी ‘यु टर्न’ घेतला आहे. आज अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज असताना त्यांना ती दिली गेली नाही. सप्टेंबर २0१९ पर्यंतची मुदत घातल्याने अनेकजण यापासून वंचित राहणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार नाही. या सर्व बाबींविरोधात भाजप रस्त्यावर उतरून संघर्ष करणार आहे.

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत राजकारणातून समाज विघटन करण्यासाठी अफवा पसरवल्या जात आहेत. राज्याची आर्थिक स्थिती आम्ही असताना उत्तम होती. राज्य डबघाईला आले असल्याची चर्चा राष्ट्रवादी करते आणि आमच्यासोबत सत्तेत असलेली शिवसेना सुरात सूर मिसळते याचे आश्चर्य वाटते. यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, अमल महाडिक, महेश जाधव, राहूल चिकोडे, विजय जाधव उपस्थित होते.स्वरूप आणि राहुल महाडिक भाजपमध्ये माजी खासदार धनंजय महाडिक यांचे सांगली जिल्ह्यातील चुलत बंधू स्वरूप आणि राहुल महाडिक यांनी या पत्रकार परिषदेदरम्यान फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश  केला. यावेळी प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, धनंजय महाडिक, सुरेश हाळवणकर, महेश जाधव, अमल महाडिक आदी उपस्थित होते. 

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपाkolhapurकोल्हापूर