शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरेंची देखील मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी; सभागृहात महाविकासआघाडी मुद्दा लावून धरणार

By योगेश पांडे | Updated: December 20, 2022 19:34 IST

उद्धव ठाकरे यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. 

नागपूर : विधीमंडळात नागपुरातील नासुप्रच्या भूखंडाचे प्रकरण पेटल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेदेखील मुख्यमंत्र्यांच्या राजिनाम्यासाठी मैदानात उतरले आहेत. राजा चुकला तर त्याचे फटके जनतेला बसतात. ज्या पद्धतीने राज्यातील सरकारचे काम सुरू आहे, त्यावरून राजा चुकत असल्याचे दिसत आहे व ते सांगणे आमचे कामच आहे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राजिनाम्याची मागणी केली.

नासुप्रच्या भूखंडाबाबत नागपूर खंडपीठाने दिलेला स्थगिती आदेश गंभीर आहे. उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे हा जुना विषय इतका सोपा असेल तर इतकी वर्ष कोर्टात का होता व त्याला स्थगिती का देण्यात आली आहे याचे त्यांनी उत्तर द्यावे. स्थगिती देताना प्रकरणी न्यायप्रविष्ट विषय असताना सरकारने यामध्ये हस्तक्षेप केल्याचं सांगितलं आहे. ज्या खात्याचा निर्णय आहे त्या खात्याचे मंत्री मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सरकारकडून बाजू मांडली जाणार असेल तर त्यात हस्तक्षेप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आरोप झाल्यावर याआधीही मंत्र्यांचे राजीनामे घेण्यात आले आहेत. यंत्रणेवर अवाजवी दवाब असता कामा नये. जोपर्यंत निकाल लागत नाही तोवर त्या व्यक्तीने पदावर राहणं योग्य नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. महाविकासआघाडी हा मुद्दा सभागृहात लावून धरणार असल्याचेदेखील त्यांनी सांगितले.

आमदारांच्या निधीला कात्री लावण्यात आली व तो विषयदेखील महत्त्वाचा आहे. सरकारने आता आश्वासन दिले असले तरी आमदारांच्या निधीतील विषमता खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.

ग्रामपंचायतीच्या विजयाचे श्रेय घेणे हा बालीशपणाग्रामपंचायतीच्या विजयाचे श्रेय घेण्याची सत्ताधाऱ्यांमध्ये चढाओढ दिसून येत आहे. प्रत्यक्षात ग्रामपंचायतीच्या निवडणूकांचे वातावरण वेगळे असते. तेथे पक्षापेक्षा स्थानिक बाबी महत्त्वाच्या असतात. त्यामुळे तेथील यश-अपयश पक्षाचे नसते. त्या विजयाचे श्रेय घेणे हा बालीशपणाच आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

राज्य सरकार घाबरटसीमाप्रश्नावरदेखील उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली. सीमाप्रश्नाच्या आंदोलनात अगोदर लाठ्याकाठ्या खाल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत. मग आता ते गप्प का आहेत. मराठी माणूस कर्नाटकच्या सरकारचा मार खातो आहे. आता सरकार ठोस भूमिका घेणार नाही का असा सवाल त्यांनी केला. राज्य सरकार घाबरट असून कर्नाटकच्या नेत्यांनी डोळे दाखविले तर माघार घेतली, अशी टीकादेखील त्यांनी केली.

राज्यपालांनी स्वत:हून रामराम ठोकावाराज्यपाल भगतसिंह कोश्यारी त्यांच्या नेतृत्वाला मी काय करू असे विचारत आहेत. महाराष्ट्राचा त्यांनी अपमान केला असून त्यांच्याबाबत राज्यात असंतोष आहे. त्यांच्या लाज शिल्लक असेल तर त्यांनी स्वत:हून रामराम ठोकावा, असे उद्धव ठाकरे यांनी प्रतिपादन केले.

मोर्चा ‘फडणवीस साईज’चादेवेंद्र फडणवीस यांनी महाविकासआघाडीच्या मुंबईतील मोर्चाला ‘नॅनो मोर्चा’ म्हटले होते. त्याबाबत विचारणा केली असता तो मोर्चा ‘फडणवीस साईज’चा असल्याचे ठाकरे म्हणाले.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेChief Ministerमुख्यमंत्रीnagpurनागपूर