शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

...तेव्हा दंगल भडकवण्याचं उद्धव ठाकरेंनी प्लॅनिंग केलं होतं; भाजपा आमदार नितेश राणेंचा मोठा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2023 10:48 IST

९ महिने महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होतोय त्यात उद्धव ठाकरे आणि टोळीचा हात आहे का याची चौकशी गृहखात्याने केली पाहिजे अशी मागणी आमदार नितेश राणेंनी केली.

मुंबई - १९९३ च्या दंगली जशा घडल्या तशीच दंगल आपल्याला घडवायची आहे. उद्धव ठाकरेंनी त्या बैठकीत संबंधित पदाधिकाऱ्यांना चर्नीरोड परिसरातील मुस्लिम फेरिवाल्यांवर हल्ला करावा, त्यानंतर दंगली भडकवण्याची जबाबदारी माझी असेल असं बैठकीत उद्धव ठाकरे म्हणाले होते. दंगलीचा फायदा घेऊन मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न त्यांचे होते असा मोठा दावा भाजपा आमदार नितेश राणेंनी केला आहे. 

आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, उद्धव ठाकरे सातत्याने दंगली भडकवण्याचा आरोप करतायेत. ९ महिन्यापासून आमच्या सरकारवर असे आरोप करतात पण १३ ऑगस्ट २००४ मातोश्रीत एक बैठक झाली. त्या बैठकीत स्थानिक लोकाधिकारी समितीचे सरचिटणीस आणि एक खासदार जे आता शिंदेंसोबत आहेत. त्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी दंगली घडवण्याचं प्लॅनिंग केले होते असा आरोप त्यांनी केला. 

तसेच ९ महिने महाराष्ट्रात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होतोय त्यात उद्धव ठाकरे आणि टोळीचा हात आहे का याची चौकशी गृहखात्याने केली पाहिजे. मालवणी, छत्रपती संभाजीनगरमध्ये घडलेल्या घटनेत उद्धव ठाकरेंचा हात आहे का याची चौकशी करावी. १९९९ पासून आजपर्यंत उद्धव ठाकरे सातत्याने मुख्यमंत्री बनण्याचे स्वप्न पाहतायेत. उद्धव ठाकरे हा किती कपटी आहे, हे मी तारखेसकट आणि पुराव्यासकट बोलतोय. राज्यात दंगल घडली तर त्याला जबाबदार उद्धव ठाकरेंनाच धरले पाहिजे अशी मागणीही आमदार नितेश राणेंनी केली. 

संजय राऊत भूमाफियाराऊत आमच्या नेत्यांना भाषण माफिया बोलतात, पण तू किती मोठा भूमाफिया आहे? याचे पुरावे महाराष्ट्राला देतो. अलिबागच्या किहिम बीचवर तुला प्लॉट हवा होतो म्हणून एका मराठी कुटुंबाला दमदाटी करून ही जमीन बळकावली. किहिम बीचवर रिसोर्ट बांधण्यासाठी कवडीमोल दरात जमीन घेतली. भांडूप, विक्रोळी परिसरात R या अक्षरावरून सुरू होणाऱ्या बिल्डरसोबत तुझी पार्टनरशिप आहे. तू किती जणांची जमीन बळकावली आहे याचेही उत्तर राऊतांनी द्यावे असं नितेश राणे म्हणाले. 

त्याचसोबत मराठी माणसाच्या हितासाठी बेळगावत जाऊन भाषण केल्याचा दावा करणाऱ्या राऊतांनी पत्राचाळीतील मराठी लोकांची घरे लाटली, आज कोर्टात त्यामुळे हजेरी लावायची आहे. स्वत: जामीनावर बाहेर आहे. या प्रकरणातून सुटका झाली नाही. बेळगावच्या मराठी जनतेला सांगेन, लुटारू, दरोडेखोर, फसवणूक करणाऱ्या माणसाला बळी पडू नका. चपट्या पायाचा घरफोड्या माणसाचे ऐकून चुकीच्या लोकांना मतदान करू नका. बेळगावच्या जनतेने योग्य तो निर्णय घ्यावा असंही नितेश राणेंनी आवाहन केले. 

दरम्यान, बाळासाहेबांना संजय राऊतांना अनेकदा त्रास दिला. विविध लेख बाळासाहेब आणि शिवसेनाविरोधात लिहित होता. हा माणूस महाविकास आघाडी आणि शरद पवारांची किती वाट लावतोय हे आता मविआ नेत्यांना दिसतोय. मविआ एकत्र ठेवायची आहे मग कुणाच्या सांगण्यावरून हे अग्रलेख लिहितोय हे जाहीर करावे. संजय राऊत राष्ट्रवादीत प्रवेश करतायेत या पत्रकाराच्या प्रश्नावर संजय राऊतांनी उत्तरही दिले नाही. आतमधून हालचाली आहे. राऊत राष्ट्रवादीत जाण्याच्या तयारीत आहे असा दावा पुन्हा एकदा नितेश राणेंनी केला. जितेंद्र आव्हाडांना इशाराजितेंद्र आव्हाड यांनी द केरळ स्टारी निर्मात्याला फाशी देण्याची भाषा केली, आम्हालाही फटके देण्याची भाषा करता येईल. महाराष्ट्रात सक्षम गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत. बाळासाहेबांच्या कडवट विचारांना मानणारे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे आव्हाडांनी अशी भाषा करू नये. गृहमंत्रालय आव्हाडांच्या वक्तव्याची योग्य दखल घेऊन कारवाई करेल असा विश्वास आहे. सिनेमाच्या निर्माते, कलाकार यांच्या केसालाही धक्का लागला तर जितेंद्र आव्हाडांची काय अवस्था होईल याचा विचार करा असा इशाराही आमदार नितेश राणेंनी दिला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतNitesh Raneनीतेश राणे Uddhav Thackerayउद्धव ठाकरे