शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
7
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
8
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
9
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
10
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
11
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
12
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
13
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
14
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
15
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
16
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
17
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
18
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
19
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
20
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
Daily Top 2Weekly Top 5

"एक दिवस तुम्हाला 'मातोश्री'च्या दारात यावेच लागेल, हे माझं भाकीत नसून..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 12:57 IST

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याशी जवळीक साधण्याचं काम नाही. ते जे उत्तम गोष्टी करतात त्याबद्दल चांगली भूमिका मांडायला हरकत नाही यालाच लोकशाही म्हणतात असं सांगतात फडणवीस-ठाकरे जवळकीवर संजय राऊतांनी भाष्य केले.

मुंबई - ही तुमची सत्तेमुळे फडफड सुरू आहे. जेव्हा सत्ता जाईल तेव्हा कळेल. एक दिवस तुम्हाला मातोश्रीच्या दारात यावेच लागेल, शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावे लागेल असं सांगत खासदार संजय राऊत यांनी रामदास कदमांवर घणाघात केला आहे. रामदास कदमांनीउद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत जहरी टीका केली होती. त्याला संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे.

संजय राऊत म्हणाले की, आमच्यासारखे लोक पक्षासोबत इमानइतबारे राहिले आहेत त्यांच्याकडे बळ आहे, दिल्लीच्या मोगलांशी हातमिळवणी करून जे महाराष्ट्राचा विध्वंस करणाऱ्या शक्ती आहेत त्यांना रोखण्याची, संपवण्याची ताकद उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेनेला परमेश्वराने दिली आहे. हे तुमचे फडफडणं तात्पुरते आहे. सत्ता आहे म्हणून फडफडणं आहे. एक दिवस तुम्हाला मातोश्रीच्या दारात यावे लागेल. शिवसेना भवनाच्या दारात उभं राहावे लागेल हे माझं भाकीत नसून हा माझा दावा आहे असा टोला त्यांनी रामदास कदमांना लगावला. 

तर राजकारणात पैशाचा जोर वाढलेला आहे. ज्याप्रकारे निर्णय देवेंद्र फडणवीस घेत आहेत त्यातून याला बूच लावण्याचं काम सुरू आहे. भ्रष्टाचाराचा पैसा आमदार, नगरसेवक खरेदी विक्रीत वापरला जातोय, त्याला आवर घालण्याचं काम फडणवीस करतायेत. त्यामुळे जे पैशाच्या अपेक्षेने गेले आहेत त्यांना मधल्या मध्ये लटकत राहावे लागणार आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री, त्यांच्याशी जवळीक साधण्याचं काम नाही. ते जे उत्तम गोष्टी करतात त्याबद्दल चांगली भूमिका मांडायला हरकत नाही यालाच लोकशाही म्हणतात असं सांगतात फडणवीस-ठाकरे जवळकीवर संजय राऊतांनी भाष्य केले.

काय म्हणाले होते रामदास कदम?

दरम्यान, फक्त कोकणातूनच नव्हे तर राज्यभरातून अनेक जण शिवसेनेत प्रवेश करतायेत. कोकणात ठाकरेंचा एक आमदार निवडून आलाय. बाकी कोकणातून त्यांची जागा आली नाही. कोकणातून पूर्णपणे उद्धव ठाकरेंना हद्दपार केलेले आहे. भविष्यात महाराष्ट्रातही उद्धव ठाकरे हद्दपार होतील. गंगेत अनेक लोकांनी डुबक्या मारल्या त्या सर्वांनीच पाप केले होते का, ज्यांना कावीळ असते त्यांना जग पिवळं दिसतं. सकाळी उठल्यापासून उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांना केवळ एकनाथ शिंदेंच दिसतात, ठाकरेंकडे हम दो, हमारे तीन इतकेच शिल्लक राहतील असं रामदास कदमांनी म्हटलं होते. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेRamdas Kadamरामदास कदमDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस