शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

ठाकरे सरकारचा आणखी एक धक्का; घटवली 'या' भाजपा नेत्यांची सुरक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 12:43 IST

भाजपाच्या अनेक नेत्यांच्या सुरक्षेत सरकारकडून कपात

मुंबई: युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंना झेड दर्जाची सुरक्षा देण्याचा निर्णय घेणाऱ्या उद्धव ठाकरे सरकारनं भाजपा नेत्यांच्या सुरक्षेत मात्र कपात केली आहे. याशिवाय भारतरत्न सचिन तेंडुलकर, सरकारी वकील उज्ज्वल निकम यांचीदेखील सुरक्षा कमी करण्यात आली आहे. याआधी उद्धव ठाकरे सरकारनं देवेंद्र फडणवीसांच्या कार्यकाळातल्या अनेक निर्णयांना स्थगिती देण्याचा धडाका लावला होता. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर टीका केली होती.भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आधी वाय दर्जाची सुरक्षा होती. आता त्यांच्या सुरक्षेतील एस्कॉर्ट काढून घेण्यात आली आहे. आता त्यांच्यासोबत दोन हवालदार असतील. भाजपा आमदार प्रसाद लाड यांच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसेंची एस्कॉर्ट सुरक्षा काढून घेण्याचा निर्णय सरकारकडून घेण्यात आला आहे.माजी मुख्यमंत्री आणि आता भाजपाच्या कोट्यातून राज्यसभेचे खासदार असलेले नारायण राणेंची सुरक्षादेखील कमी करण्यात आली आहे. आधी त्यांना वाय प्लस सुरक्षा होती. ती आता वाय करण्यात आली आहे. यासोबतच माजी राज्यपाल राम नाईक यांची सुरक्षा झेड प्लसवरुन एक्स दर्जाची करण्यात आली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना झेड दर्जाची सुरक्षा आहे. तर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंची सुरक्षा वाय प्लसवरुन झे़ड दर्जाची करण्यात आली आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांची झेड प्लस दर्जाची सुरक्षा वाय दर्जाची करण्यात आली आहे. माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरची एक्स दर्जाची सुरक्षा काढून घेण्यात आली आहे. तर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची झेड प्लस सुरक्षा कायम ठेवण्यात आली आहे.  

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेEknath Khadaseएकनाथ खडसेAshish Shelarआशीष शेलारPrasad Ladप्रसाद लाडUjjwal Nikamउज्ज्वल निकमanna hazareअण्णा हजारेSachin Tendulkarसचिन तेंडुलकरRam Naikराम नाईकSharad Pawarशरद पवार