शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

उद्धव ठाकरेंना मिळाला छोटा रिचार्ज, केजरीवाल यांच्या भेटीवर ओवैसींची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 06:51 IST

एआयएमआयएमचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन रविवारी मुंबईत होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे  शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.  

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई :   दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. छोटा रिचार्ज येऊन गेल्याचे समजते, अशा शब्दांत एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी या भेटीवर मिश्कील टिप्पणी केली.  तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रिमोट कंट्रोल मोदी-शाह यांच्या हातात असल्याची टीकाही त्यांनी पत्रकारांशी बोलताना केली. 

एआयएमआयएमचे पहिलेच राष्ट्रीय अधिवेशन रविवारी मुंबईत होत आहे. त्याची माहिती देण्यासाठी नवी मुंबईतील महापे येथे  शनिवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते.  यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खा. इम्तियाज जलील यांच्यासह सोळा राज्यांतील पक्षाचे खासदार, आमदार आणि अध्यक्ष उपस्थित होते. 

केंद्र सरकार मुस्लिमांच्या विरोधात आहे. हरयाणा आणि राजस्थानमध्ये अल्पसंख्याकांवर अन्याय होत आहेत. पीडितांना न्याय मिळवून देण्याऐवजी काँग्रेस भारत जोडो यात्रेत मग्न आहे. लव्ह जिहादच्या मोर्चामागे  भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असल्याची टीका ओवैसी यांनी केली. 

लोकभावना विचारात न घेता औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहरांचे अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर  आणि धाराशिव, असे नामकरण केले आहे, अशी टीका त्यांनी केली. लोकसभा निवडणुकीत आम्ही औरंगाबाद जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभा निवडणुकीसाठी कोणाशी आणि कशी आघाडी करायची, याबाबत या अधिवेशनात चर्चा होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

केवळ नाव बदलून हे शक्य होणार नाही, याची सरकारलाही जाण आहे. एकूणच जनतेच्या भावनेशी हा खेळ असून त्याविरोधात आमची कायदेशीर लढाई सुरूच राहील, असे खा. जलील यांनी स्पष्ट केले.

तीन पक्षांसोबत आघाडी करणारराज्यातील आगामी महा पालिकांसह विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांत एमआयएम तीन पक्षांसोबत आघाडीचा ठराव अधिवेशनात करण्यात येणार आहे. हे पक्ष समविचारी असतील, मात्र ते कोणते पक्ष आहेत, याची माहिती देण्यात आली नाही.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेArvind Kejriwalअरविंद केजरीवालAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसी