शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीस हे दिल्लीश्वरांची 'नावडाबाई'; अर्धवटराव टीकेवरून उद्धव ठाकरेंचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2023 15:45 IST

सत्ताधाऱ्यांवर कुठले आरोप केले जातायेत त्यावर चौकशी होतेय असं दिसत नाही. रोज क्लीनचीट मिळतेय. या सर्व क्लीनचीट आम्ही आमचे सरकार आल्यावर काढू असं उद्धव ठाकरेंनी सांगितले.

मुंबई - ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील शाब्दिक कलगीतुरा सुरूच आहे. शिवसेना वर्धापन दिन मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर टीका केली होती. त्या टीकेला देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरद्वारे उत्तर देत उद्धव ठाकरेंना अर्धवटराव अशी उपमा दिली होती. आता त्याच अर्धवटराव टीकेवरून उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर पलटवार केला आहे. 

उद्धव ठाकरे म्हणाले की, मोदींनी लस तयार केली नसती तर असं विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले. फडणवीस असं बोलतील यावर विश्वास नव्हता. मोदींनीही असे विधान केले नसावे. मी हा व्हिडिओ दाखवला. तो मोर्फ केला असेल तर चौकशी करा. त्यावर त्यांनी मला अर्धवटराव म्हणाले, अर्धवटराव हे पात्र रामदास पाध्येंनी तयार केले. मला अर्धवटराव म्हणत असतील तर फडणवीस दिल्लीश्वरांची आवडाबाई आहे का? आता तेही दिसत नाही ते नावडाबाई झालेत. मोदींनी लस बनवली या वाक्याला अर्थ आहे का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. क्लीनचीट दिल्या तर त्याची चौकशी करूसत्ताधाऱ्यांवर कुठले आरोप केले जातायेत त्यावर चौकशी होतेय असं दिसत नाही. रोज क्लीनचीट मिळतेय. या सर्व क्लीनचीट आम्ही आमचे सरकार आल्यावर काढू. या क्लीनचीट कुणी दिल्या आणि कशा दिल्या याची सविस्तर चौकशी करू. बीएमसीतील भ्रष्टाचार बाहेर काढायचा असेल तर काढा आम्ही घाबरत नाही. सरकारी यंत्रणांचा दबाव आहेच, गद्दारांकडे स्वत:ची ताकद नाही, ताकदही चोरावी लागतेय. ताकदही पोलिसांची वापरावी लागते. पोलिसांशिवाय पान हलत नाही असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला. 

आम्ही केंद्रावर दोषारोप केले नाहीत मोदींनी लस तयार केली नसती तर कटोरा घेऊन उभे राहावे लागले असते असं फडणवीस म्हणतात, तुम्ही लोकांना मुर्ख समजता का? १७ कोटी लस दिल्या सांगता, मी मुख्यमंत्री असताना लस विकत घेण्याची तयारीही दाखवली होती. आम्ही पैसे देतो आम्हाला पाहिजे तेवढ्या लस द्या पण दिल्या नाहीत. तरीही आम्ही केंद्रावर दोषारोप केला नाही. केंद्राने पीपीई किट कुठून आणल्या? त्याची खरेदी कशी केली. त्यात घोटाळा झाला का? N95 मास्क कुठून आणलेत, टेंडर काढले होते का असे प्रश्न आम्ही विचारत नाही अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपा