उद्धव ठाकरेंना दिलासा

By Admin | Updated: September 29, 2016 03:12 IST2016-09-29T03:12:37+5:302016-09-29T03:12:37+5:30

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून संबोधून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी

Uddhav Thackeray console | उद्धव ठाकरेंना दिलासा

उद्धव ठाकरेंना दिलासा

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी देशाला ‘हिंदू राष्ट्र’ म्हणून संबोधून भारताला हिंदू राष्ट्र घोषित करण्याची मागणी केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. शिंदे यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्याही राजीनाम्याची मागणी केली आहे. राजनाथ सिंह यांनी ‘सेक्युलॅरिझम’चा अर्थ धर्मनिरपेक्ष, असा घेऊ नये, असे म्हटले होते. घटनेच्या उद्देशिकेवर हा एक प्रकारे हल्लाच आहे,’ असे शिंदे यांनी याचिकेत म्हटले होते. मात्र, उच्च न्यायालयाने शिंदे यांची याचिका फेटाळली. (प्रतिनिधी)

Web Title: Uddhav Thackeray console