शहरं
Join us  
Trending Stories
1
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
2
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
3
“सांगलीत विशाल पाटलांवर अन्याय झाला, काँग्रेसच्या...”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
4
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
5
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
6
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
7
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
9
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
10
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
11
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!
12
उद्धव ठाकरे म्हणाले, 'आता माझी सटकली, आता तुमची...' एकनाथ शिंदेंनी दिलं असं प्रत्युत्तर
13
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज अयोध्येला जाणार, रामललाचे दर्शन घेणार, रोड शो करणार!
14
भाजपा उमेदवाराच्या विरोधात आंदोलनादरम्यान शेतकऱ्याचा मृत्यू, पोलिसांनी धक्का दिल्याचा आरोप
15
मोबाईलवर मुलांशी बोलते म्हणून ओरडला, १४ वर्षांच्या मुलीने कुऱ्हाडीने मोठ्या भावाचा गळा कापला  
16
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
17
कोव्हिशिल्डमुळेच आलाय श्रेयस तळपदेला हार्ट अटॅक?, अभिनेता म्हणाला - "लस घेतल्यानंतरच..."
18
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
19
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
20
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते

दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंचा उल्लेख टाळला

By balkrishna.parab | Published: October 01, 2017 8:07 AM

विजयादशमीच्या मुहुर्तावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका करणाऱ्या नारायण राणे यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण भाषणात टाळला. 

मुंबई -  विजयादशमीच्या मुहुर्तावर झालेल्या दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन करताना केंद्रातील मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. मात्र गेल्या काही दिवसांपासून शिवसेना आणि उद्धव ठाकरेंवर सातत्याने टीका करणाऱ्या नारायण राणे यांचा उल्लेख उद्धव ठाकरे यांनी संपूर्ण भाषणात टाळला. काँग्रेसच्या नेतृत्वावर नाराज होत पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींवर टीका केली होती. तसेच आपल्या भाजपा प्रवेशात आडकाठी ठरलेल्या उद्धव ठाकरेंवरही राणेंनी टीकास्र सोडले होते. बाळासाहेबांना उद्धव ठाकरेंएवढा त्रास कुणीही दिला नसेल, अशी बोचरी टीका नारायण राणेंनी दसऱ्याच्या पूर्वसंध्येला डोंबिवलीत बोलताना केली होती. त्यामुळे राणेंच्या टीकेला उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यातून प्रत्युत्तर देतील, अशी अपेक्षा होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यातील आपल्या भाषणात राणेंचा अनुल्लेख करणेच योग्य समजले. दरम्यान, दसरा मेळाव्यातील भाषणात उद्धव ठाकरे यांनी भाजपा आणि मोदींवर जोरदार टीका केली.  शिवसेनेचे सगळे काही खणखणीत अन् ठणठणीत असते. आम्ही सरकारला साथही देऊ आणि जनतेच्या प्रश्नांवर प्रसंगी लाथा मारू, असे सांगत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना केंद्र व राज्य सरकारमध्ये कायम राहणार असल्याचे शनिवारी स्पष्ट केले.दसरा मेळाव्यात ते म्हणाले की, देशभर कारभाराचा चिखल झाला आहे. मळच मळ दिसतो, कमळ कुठे दिसत नाही. स्वत: अच्छे दिनचे स्वप्न पाहणारे सरकार सामान्यांची झोप उडवत आहे. उद्धव यांनी पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य केले. सहनशीलतेचा अंत पाहू नका. वाटेल त्या क्षणी निर्णय घेऊ, एवढाच काय तो इशारा ठाकरे यांनी दिला.मेळाव्यासाठी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पण गर्दीचा आकडा ओसरल्याचे दिसत होते. सत्तेतून बाहेर पडण्याची भूमिका उद्धव जाहीर करतील, या अपेक्षेने आलेल्या शिवसैनिकांची निराशा झाल्याचे जाणवत होते.आम्ही सत्तेत का आहोत असा सवाल करणाºयांना काश्मीर, बिहारमध्ये तत्वांशी तडजोड करून उपमुख्यमंत्रीपद घेतलेले कसे चालते?, असा सवाल करून,ठाकरे यांनी २५ वर्षांपासूनच्या मित्राला भाजपा संपवायला निघाल्याचा आरोप केला. संपवण्याचा प्रयत्न केल्यास देशच उसळेल असा इशारा त्यांनी दिला. सत्तेत राहून हिंदुत्व, महागाई, महिलारक्षण, शेतकºयांची कर्जमुक्ती यावर आमचे आंदोलन सुरूच राहील आणि ते चिघळेल, असे सांगून ते म्हणाले की, पंतप्रधान वा कुणाविषयी आचकट विचकट घोषणा देऊ नका, ती आपली संस्कृती नाही. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNarayan Raneनारायण राणे BJPभाजपा