शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

उद्धव ठाकरे-फडणवीस यांच्यात बंदद्वार ‘गुफ्तगू’; राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना आले उधाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 06:53 IST

Uddhav Thackeray and devendra Fadnavis meeting: ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला माजी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृहावर ज्या सभागृहात मंत्रिमंडळाची बैठक होते, त्याच ठिकाणी ही बैठक झाली. या सभागृहाच्या बाजूला मुख्यमंत्र्यांचा एक कक्ष आहे. 

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात शुक्रवारी सह्याद्री अतिथीगृहावर बंदद्वार चर्चा झाल्याने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे मुख्यमंत्र्यांसंदर्भातील वादग्रस्त विधान आणि त्यानंतर राणे यांना झालेली अटक या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये चर्चा झाल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

ओबीसींच्या राजकीय आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे यांनी बोलविलेल्या सर्वपक्षीय बैठकीला माजी मुख्यमंत्री फडणवीस उपस्थित होते. सह्याद्री अतिथीगृहावर ज्या सभागृहात मंत्रिमंडळाची बैठक होते, त्याच ठिकाणी ही बैठक झाली. या सभागृहाच्या बाजूला मुख्यमंत्र्यांचा एक कक्ष आहे. 

बैठकीनंतर मुख्यमंत्री व फडणवीस सोबतच त्या कक्षात गेले. याचा अर्थ ओबीसी बैठकीनंतर बंदद्वार चर्चा करायची हे दोघांमध्ये आधीच ठरले होते, असे सांगितले जात आहे. त्यामुळे ही चर्चा न ठरविता अचानक झाली नाही, हे स्पष्ट होते. उभयतांमध्ये जवळपास दहा ते बारा मिनिटे ही चर्चा झाली. त्या वेळी आधीच्या बैठकीला उपस्थित असलेल्यांपैकी तीन-चार मंत्री कक्षाबाहेरच थांबले होते.

‘ही’ भेट आणि ‘ती’ भेट...फडणवीस यांनी गुरुवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याशी वीस मिनिटे बंदद्वार चर्चा केली होती. मुख्यमंत्री व महाविकास आघाडीच्या नेत्यांना राज्यपालांनी भेट नाकारली; पण फडणवीस यांना त्यांनी वेळ दिला, अशी चर्चा गुरुवारी रंगली होती. त्यानंतर लगेच शुक्रवारी ठाकरे-फडणवीस चर्चेने राजकीय तर्क-वितर्कांना उधाण न आले, तरच नवल.

राणे यांचा हल्लाबोल सुरूचनारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांविषयी काढलेल्या अनुद्गारानंतर तणाव निर्माण झाला. शिवसेना-भाजपच्या नेत्यांमध्ये वाक्युद्धही रंगले. राणेंना अटक होऊन जामिनावर सुटका झाल्यानंतर त्यांची जनआशीर्वाद यात्रा शुक्रवारपासून पुन्हा सुरू झाली. मात्र, राणे यांनी आधीप्रमाणेच पुन्हा एकदा मुख्यमंत्री आणि शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे. या पार्श्वभूमीवर ठाकरे-फडणवीस यांच्यातील बंदद्वार चर्चेला महत्त्व आले आहे.मुख्यमंत्री ठाकरे यांनी यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी दिल्ली दौऱ्यात तासभर चर्चा केली होती. तेव्हाही राजकीय चर्चांना उधाण आले होते. 

राणेंच्या टीकेची धार कमी होईल?काही दिवस अगोदर  झालेली अटक व सुटकेनंतर नारायण राणे शिवसेनेवरील शाब्दिक हल्ले कमी करतील, असे वाटत असताना त्यांनी अधिकच तीव्र आणि वैयक्तिक टीका चालविली आहे. मुख्यमंत्री ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात या विषयावर चर्चा झाल्याचे सूत्रांनी सांगितले. या भेटीनंतर नारायण राणे हे शिवसेना व ठाकरे परिवारावरील टीकेची धार कमी करतात का, याबाबत उत्सुकता असेल. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNarayan Raneनारायण राणे