शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन'; ऑपरेशननंतर प्रथमच समोर आला फोटो, बाळासाहेबांना अभिवादन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2022 14:21 IST

Uddhav Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून सुभाषचंद्र बोस, बाळासाहेब ठाकरे यांना जयंतीनिमित्त अभिवादन!

मुंबई : नेताजी सुभाषचंद्र बोस आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी रविवारी वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमांना पुष्पहार घालून अभिवादन केले.

गेल्या काही दिवसांपूर्वी मानदुखीचा त्रास झाल्यामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना विश्रांती करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे गेले काही दिवस ते घरीच आराम करत होते. दरम्यान, या आजारपणातून बरे झाल्यानंतर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पहिल्यांदाच उद्धव ठाकरे अशा पद्धतीने फोटोच्या माध्यमातून समोर आले आहेत. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर ते झोपून आहेत, कशाचा तरी आधार घेऊनच त्यांना चालावे लागते, अशा काही वावड्या राजकीय वर्तुळात उठवल्या जात होत्या. मात्र, अशा वावड्यांना उद्धव ठाकरेंच्या आजच्या फोटोमुळे पूर्णविराम मिळाला आहे. तसेच, उद्धव ठाकरे 'फिट अँड फाईन' असल्याचे दिसून येत आहे.

उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत साधणार संवाद!बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनानिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे शिवसैनिकांसोबत आज संवाद साधणार आहेत. हा संवाद ऑनलाईन व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे होईल, अशी माहिती आहे. मात्र आता बऱ्याच दिवसानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आपल्या शिवसैनिकांना आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काय कानमंत्र देणार आणि काय मार्गदर्शन करणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेAaditya Thackerayआदित्य ठाकरेNetaji Subhashchandra Boseनेताजी सुभाषचंद्र बोसBalasaheb Thackerayबाळासाहेब ठाकरे