उद्धव ठाकरे आज शिर्डीत, शिवसैनिकांना संबोधित करणार
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2018 07:21 IST2018-10-21T07:21:09+5:302018-10-21T07:21:21+5:30
लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत.

उद्धव ठाकरे आज शिर्डीत, शिवसैनिकांना संबोधित करणार
अहमदनगर : लोकसभेची निवडणूक स्वबळावर लढविण्यासाठी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघ पिंजून काढणार आहेत. याची सुरुवात रविवारी अहमदनगरमधल्या शिर्डीतून होणार आहे. पहिली सभा आज सकाळी ११ वाजता शिर्डीत होणार आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसैनिकांचा मेळावा होणार आहे. या शिवसैनिकांच्या मेळाव्याला उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत.