शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

युतीसाठी उद्धव यांनी दिला १५ दिवसांचा अल्टिमेटम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2019 06:37 IST

स्वाभिमान गहाण ठेवून युती करू नका; शिवसेना खासदारांची भावना

- यदु जोशीमुंबई : भारतीय जनता पार्टीने युतीबाबत ठोस प्रस्ताव देऊन १५ दिवसांत काय तो निर्णय करावा; अन्यथा आम्ही वेगळे लढण्यास मोकळे आहोत, असा अल्टिमेटम शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सोमवारी भाजपाला दिला. स्वबळावर लढलो तर काळजी करू नका, मी तुमच्या पाठीशी सगळी ताकद उभी करेन, असा दिलासाही उद्धव ठाकरे यांनी शिवसेना खासदारांना दिला.शिवसेना खासदारांची सोमवारी ‘मातोश्री’वर बैठक झाली. या बैठकीत लोकसभा मतदारसंघनिहाय आढावा घेण्यात आला. या वेळी उद्धव म्हणाले, भाजपावर विश्वास तरी कसा ठेवायचा? राज्यात आणि केंद्रात आम्हाला त्यांनी योग्य वाटा दिला नाही. जे कबूल केले तेही दिले नाही. आता ते काय देणार आहेत हे त्यांनी टीव्हीसमोर येऊन सांगावे. उगाच बातम्या पसरवू नयेत. आमच्या अटी मान्य केल्या, तरच युती करू. अन्यथा, स्वबळावर लढण्याची भूमिका आम्ही घेतली आहे. बिहारमध्ये भाजपाने निवडून आलेल्या पाच जागा मित्रपक्षांसाठी सोडल्या. आम्ही तर आमच्या हक्काच्या जागा मागत आहोत, असे सांगत उद्या युती झाली तर त्याचे समर्थन काय द्यायचे ते मी पाहीन, तुम्ही त्याची काळजी करू नका, असे उद्धव ठाकरे यांनी उपस्थित खासदारांना सांगितले. आमच्यासाठी तुमचा स्वाभिमान महत्त्वाचा आहे आणि तो गहाण ठेवून कदापिही भाजपाशी युती करू नका. आम्ही सगळे तुमच्या मागे उभे आहोत, अशी ग्वाही शिवसेनेच्या सर्व खासदारांनी या वेळी उद्धव ठाकरे यांना दिली.माझी लढाई तुमच्यासाठी आहेमला आमदार, खासदार वा मुख्यमंत्री व्हायचे नाही. बाळासाहेबांप्रमाणे मीदेखील पद घेणार नाही. मी राजकारणात आज आहे आणि उद्या नाही. मी आदित्यला पुढे करतोच आहे. माझी लढाई तुमच्यासाठी आहे.- उद्धव ठाकरेकोणाला पक्ष सोडून जायचे असेल तर खुशाल जा. तुमच्यापैकी काही लोक काय बोलतात हे मला कळले आहे. पण मी तुम्हाला सांगतो, साम-दाम-दंड-भेद अशी सगळी शक्ती पणाला लावून मी लोकसभेला सामोरे जाण्याचे ठरविले आहे, अशी भावना उद्धव यांनी बैठकीत व्यक्त केली.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९