शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

“गरीबांना ‘आनंद शिधा’ म्हणून फक्त एक किलो धान्य, जाहिरातींवर मात्र कोट्यवधींची..,” ठाकरे गटाची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2023 08:17 IST

सरकारचा कारभार वेगवान, गतिमान वगैरे असल्याचा त्यांचा दावा असून सरकारी तिजोरीवर डल्ला मारून जनतेवर जाहिरातींचा भडिमार केला जात असल्याचा केला आरोप.

‘गरीबांना ‘आनंद शिधा’ म्हणून फक्त एक किलो धान्य आणि जाहिरातींवर मात्र कोटय़वधींची उधळण, असा मिंधे-फडणवीस सरकारचा ‘गतिमान’ कारभार सुरू आहे. जाहिरातींमधून निर्माण होणारा भ्रम वेगळा आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी,’ असे म्हणत ठाकरे गटाकडून सरकारवर टीकेचा बाण सोडण्यात आला.

‘जाहिरातींमधील पात्रांपेक्षा गारपिटीने मोडून पडलेल्या शेतकऱ्यांना बांधावर जाऊन विचारा, ते मिंधे सरकारचा ‘पंचनामा’ करताना दिसतील. महागाईने त्रस्त आयाबहिणी त्यांच्या नावाने बोटे मोडताना दिसतील. हे सरकार कागदावरील ‘आनंद शिध्या’त मश्गूल आहे आणि राज्यातील गोरगरीब जनता ‘कसला आनंद आणि कसला शिधा’ या विवंचनेत आला दिवस ढकलत आहे. सरकार तिच्या ओंजळीत ना आनंद घालीत आहे ना शिधा!,’ असे नमूद करत ठाकरे गटाने सामनाच्या संपादकीयमधून शिवसेना-भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

काय म्हटलेय अग्रलेखात?राज्यातील मिंधे सरकारचा कारभार वेगवान आणि गतिमान वगैरे असल्याचा त्यांचा दावा आहे. तसे भासविण्यासाठी सरकारी तिजोरीवर डल्ला मारून जनतेवर जाहिरातींचा भडिमार केला जात आहे. त्यातून निर्माण झालेल्या ‘भ्रमाच्या भोपळय़ा’त बसून हे सरकार स्वानंदात मग्न आहे. मात्र हा भ्रमाचा भोपळा पुन्हा फुटला आहे. सरकारच्या ‘आनंद शिधा’ योजनेची परत एकदा पोलखोल झाल्याचे संपादकीयमध्ये म्हटले आहे.

एक किलो धान्यात महिना भागवा असे म्हणायचेय का?‘गुढीपाडव्यापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीपर्यंत राज्यातील गरीब जनतेला ‘आनंद शिधा’ देण्याचे नियोजन वगैरे केले असल्याचा ढोल सरकारने बडविला होता. मात्र आता हे सरकार गरीब कुटुंबांना एका महिन्याला फक्त एक किलो धान्य ‘आनंदाचा शिधा’ म्हणून देणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही गरीबांना मदत म्हणायची की सरकारने केलेली चेष्टा? हा आनंद शिधा म्हणायचा की गरीबांच्या जखमेवर चोळलेले मीठ? गरीब आहात ना, मग एक किलो धान्यात महिना भागवा आणि त्यातच आनंद मानून घ्या, असे मिंधे सरकारला म्हणायचे आहे का?’ असा सवालही यातून करण्यात आलाय.

नाव अर्धा शिधा ठेवास्वतःला गोरगरीबांचे, शेतकऱ्यांचे सरकार म्हणवता ना, मग निदान जे तुम्हीच सांगितले ते तरी पूर्ण द्या. योजनेचे नाव ‘आनंद शिधा’ ठेवायचे आणि देताना अर्धा शिधा देऊन गोरगरीबांचा आनंद हिरावून घ्यायचा. मग योजनेचे नाव ‘अर्धा शिधा’ ठेवा! जे सरकार गरीबांना साधा शिधा देऊ शकत नाही ते आनंद काय देणार? गेल्या आठवडय़ात गुढीपाडव्याच्या वेळीही आनंद शिध्याबाबत ‘सरकारी काम, सहा महिने थांब’ असेच झाले. त्यासाठी त्यावेळी सुरू असलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाकडे बोट दाखविले गेले,’ असा आरोपही यातून करण्यात आलाय. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtraमहाराष्ट्र