शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

VIDEO- उदयनराजे, शिवेंद्रराजे समर्थक आरोपींचा हॉस्पिटलमध्ये डान्स, रुग्णांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2018 13:10 IST

खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटातील धुमश्चक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

सातारा- खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या गटातील धुमश्चक्रीप्रकरणी अटकेत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांच्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दरम्यान, सिव्हिलमध्ये उपचार घेण्याच्या नावाखाली धिंगाणा घालणाऱ्या या आरोपींचा व्हिडीओ चक्क त्यांच्याच एका अतिउत्साही कार्यकर्त्याने काढल्याचंही स्पष्ट झालं आहे. 

‘सुरुचि’ बंगल्यावरील धुमश्चक्रीप्रकरणी दोन्ही राजे गटांचे काही कार्यकर्ते अटकेत असून, त्यांच्या जामिनाची सुनावणी अद्याप न्यायालयात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर आपण आजारी असल्याचे दाखवत या कार्यकर्त्यांनी शासकीय रुग्णालयात उपचाराच्या नावाखाली आसरा घेतला आहे. दरम्यान, काही आरोपींना अंतिम जामीन मिळाल्याचे वृत्त समजताच शासकीय रुग्णालयातील या राजकीय आरोपींची ‘तब्येत’ क्षणार्धात खडखडीत झाली. त्यांनी मोबाईलवरील गाणे ब्ल्यू टूथ स्पिकरवर घेऊन मस्तपैकी नाचण्यास सुरुवात केली. 

सिव्हिलच्या एका रुममध्ये एकत्र जमलेल्या दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी हा आनंद व्यक्त करताना भलताच धुडगूस घातला. यातील जवळपास प्रत्येकाच्या हातात मोबाइल होता. रुग्णालयाच्या खोलीतील साहित्य पाहताना हे कार्यकर्ते याठिकाणी उपचारासाठी आले की पिकनिकसाठी.. असा प्रश्न पडत होता. टी-शर्ट अन् बर्मुडा घालून जोरजोरात नाचणाºया या कार्यकर्त्यांचे शूटिंग काढण्याचा मोहही यातीलच एका अतिउत्साही सहकाऱ्याला आवरता आला नाही. आपल्या मोबाइलमधून काढलेली ही क्लिप त्याने नंतर बाहेरच्या एका मित्राला व्हॉटसअ‍ॅपवरून पाठवली. मित्रालाही याचा इतका आनंद झाला की त्याने चक्क वेगवेगळ्या ग्रुपवर हा व्हिडीओ फिरवला. 

त्यानंतर हा व्हिडीओ भलताच व्हायरल झाला. पोलीस खात्याच्या हातीही हा व्हिडीओ लागला आहे. आजारी असल्याच्या नावाखाली कोठडीऐवजी शासकीय रुग्णालयात आरामात जगणाऱ्या या कार्यकर्त्यांचा ‘राजकीय आजार’ पळविण्यासाठी काय करता येईल, याचा विचार अधिकारी करीत आहेत. दरम्यान, या आरोपींच्या खोट्या आजाराला शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर मंडळीच जबाबदार असल्याची तक्रार खुद्द पोलीस खात्याने यापूर्वी आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. तसंच न्यायालयातही याबाबतचे एक पत्र दिलं होतं. या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांने कार्यकर्त्यांचा काढलेला धिंगाण्याचा व्हिडीओ न्यायालयात महत्त्वाचा पुरावा ठरू शकतो.

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंंद्रसिंहराजे भोसलेPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलCrimeगुन्हा