शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

'लोकांना शोभत असेल तर उदयनराजेंनी कॉलर उडवावी'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2019 11:51 IST

उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे.

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देणार असल्याचे संकेत दिले आहे. येत्या दोन दिवसात याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले आहे. त्यामुळे  राष्ट्रवादी सोडल्यानंतर रामराजे नाईक-निंबाळकर भाजपात जाणार की शिवसेनेत जाणार, याबाबत चर्चा सुरु आहे.

रामराजे नाईक-निंबाळकर सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्‍यातील राजघराण्याशी संबंधित आहेत. एबीपी माझा या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी फलटणच्या विकासाठी पक्षाच्या बाहेर जाऊन निर्णय घ्यावा लागेला तरी चालेल, असे सांगत राष्ट्रवादी सोडण्याचे संकेत दिले आहे. याबाबत येत्या दोन दिवसात निर्णय घेण्यात येण्यात येईल, असेही यावेळी रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले आहे. 

याचबरोबर, साताऱ्याचे छत्रपती उदयनराजे भोसले आणि रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. त्यामुळे रामराजे नाईक-निंबाळकर यांना उदयनराजेंची कॉलर उडविण्याची स्टॉईल आणि चित्रपटातील डॉयलॉग मारण्याची स्टाईल छत्रपती घराण्याला शोभा देणारी आहे का, असा सवाल करण्यात आला. यावेळी ते म्हणाले, "उदयनराजेंना आवडते आणि त्यांनी केलेले लोकांना आवडते, तर याला कोण काही करु शकणार नाही. त्यामुळे लोकांनीच त्यांना सांगितले पाहिजे की, शोभतय की नाही? लोकांना शोभत असेल तर त्यांनी आवश्य कॉलर उडवावी."

याशिवाय, रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, छत्रपती शिवेंद्रराजे माझे सहकारी होते आणि आजही आहेत. ते जिल्हा बँकेचे चेअरमन आहेत. विकासात प्रवीण आहे. त्यांना थोडी संस्कृती आहे. हे मात्र निश्चित आहे. त्यामुळे छत्रपती उदयनराजेंना मी काही बोलू इच्छित नाही, कारण मी बोललो की त्याला एक वेगळी छटा येते. निवडणुकीच्या काळात मी काही त्यांच्याबाबत बोलू इच्छित नाही, असे रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.    

टॅग्स :Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरNCPराष्ट्रवादी काँग्रेसSatara areaसातारा परिसर