शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू
2
"मी स्वत:च नकार दिला..."; मोदींच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळताच भाजपा नेत्याचा मोठा खुलासा
3
एमएचटी-सीईटीचा निकाल जाहीर: ३७ विद्यार्थ्यांना १०० पर्सेंटाईल; यंदा नऊ अधिक
4
Modi 3.0 Budget : पहिल्या अर्थसंकल्पात नोकऱ्यांवर भर देण्याची शक्यता; PLI स्कीम, लघु उद्योगांना मिळणार प्रोत्साहन
5
गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत
6
Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज
7
Success Story : एकेकाळी ₹२५० साठी करायचे काम, १२वी मध्ये दोनदा अपयश; आता उभी केली ₹१ लाख कोटींची कंपनी
8
'अभिनेत्री' आलिया भट झाली 'लेखिका', स्वतःच्या पहिल्या पुस्तकाचं केलं प्रकाशन! काय आहे विषय?
9
ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?
10
आजचे राशीभविष्य, १७ जून २०२४ : कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील, मानसिक स्वास्थ्य लाभेल
11
आइस्क्रीममध्ये मानवी बोट; उत्पादन करणाऱ्या डेअरीला अखेर FDAचा दणका
12
Upcoming IPOs: पैसे तयार ठेवा! या आठवड्यात उघडणार ३ नवे आयपीओ, पाहा संपूर्ण डिटेल्स
13
नवीन मालिका सुरु होत असताना शिवानी सुर्वेने चाहत्यांना केलं आवाहन, म्हणाली - "१२ वर्षांपुर्वी..."
14
निवृत्तीचे वय ६० करण्यास राज्य सरकार सकारात्मक
15
संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला
16
नीटची संस्था ‘नीट’ करणार; घोळ करणाऱ्यांना सोडणार नाही: सरकार उचलणार कठाेर पाऊल
17
यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक
18
विशेष लेख: ‘नीट’ परीक्षेतील ‘नटवरलाल’ नक्की कोण?
19
होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ
20
वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

Uday Samant : "हे ठाकरे गटातील गँगवॉर, शिंदेंची बदनामी करण्याचा प्रयत्न"; उदय सामंतांचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 11:44 AM

Uday Samant : उदय सामंत यांनी "घोसाळकरांवर गोळीबार झाला आणि मारणाऱ्यानेही आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून याचं कोणीही समर्थन करत नाही" असं म्हटलं आहे.

माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे पुत्र आणि ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांची मॉरिस नोरोन्हा याने हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर मॉरिस यानेही स्वत:वर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली. याच दरम्यान उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेत ठाकरे गटावर गंभीर आरोप केला आहे. "हे ठाकरे गटातील गँगवॉर, सामनातूनच मॉरिसला मोठं केलं गेलं" असं म्हणत गंभीर आरोप केला आहे. 

उदय सामंत यांनी "घोसाळकरांवर गोळीबार झाला आणि मारणाऱ्यानेही आत्महत्या केली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून याचं कोणीही समर्थन करत नाही. अशा घटना घडू नयेत म्हणून नक्कीच शासन पुढाकार घेईल. त्याच्यावर कारवाई करेल" असं म्हटलं आहे. तसेच "फेसबुक लाईव्ह, संभाषण पाहिलं असेल. माजी नगरसेवक आणि मॉरिसने भविष्यात एकत्र काम करण्याची शपथ घेतली. त्यानंतर कायमच सकाळी बोलणाऱ्यांनी एक फोटो ट्विट केला."

"फोटोमध्ये मॉरिस शिंदे साहेबांना नमस्कार करताना दिसत आहे. यातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची बदनामी करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा काही लोकांनी सुरू केला आहे. सामनातूनच मॉरिसला मोठं केलं गेलं. त्याने आपल्या अनेक बॅनरमध्ये मला उबाठा आणि शिवसेना मोठी करायची असल्याचं म्हटलं आहे.  मी जबाबदारीने सांगतोय की कालचं हे गँगवॉर हे उबाठा गटातील आहे. कारण एकमेकांच्या कॉम्पिटीशनमध्ये म्हणजे मी नगरसेवक होणार आहे की तू नगरसेवक होणार... यामध्ये हे घडलंय, हे दुर्दैवी आहे."

"एखाद्या नेत्याच्या घरात असं घडू नये ही एकनाथ शिंदेंची देखील प्रामाणिक इच्छा आहे. आमची देखील इच्छा आहे म्हणून या कठीण प्रसंगात घोसाळकर कुटुंबीयांसोबत आम्ही आहोत. असं असताना राजकारण करायचं आणि एकनाथ शिंदेना त्यामध्ये आणायचं ही प्रवृत्ती वाढते आहे. त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो" असं उदय सामंत यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :Uday Samantउदय सामंतShiv SenaशिवसेनाPoliticsराजकारणEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेAbhishek Ghosalkarअभिषेक घोसाळकर